सामाजिक दोष,समाज विघटनाचे हत्यार.
लेखांक ४९*
अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेची वीण पुनरपि सुदृढ करण्याचे प्रयत्न सर्व क्षेत्रात चालू होते. काम अवघड होते. कारण सत्ताधीश अशा धूर्त इंग्रज यांनी समाज जीवनाचे असे एकही क्षेत्र मोकळे सोडले नव्हते कि जेथे त्यांनी त्या त्या क्षेत्रातील दोषांना विकृतीचे रूप देऊन समाज विघटनाच्या प्रक्रिया सुरू केल्या नव्हत्या.
अशा क्षेत्रातील शिक्षणा सारखेच महत्वाचे क्षेत्र होते, सामाजिक व धार्मिक. या ठिकाणी तर इंग्रजांना हैदोस घालण्यास मोठीच संधी होती.
सततचा संघर्ष व हजारहून अधिक वर्षे त्यात अडकलेल्या समाजाला कालोचित परीवर्तन करण्यासाठी जी स्वस्थता लागते ती न लाभल्याने, हिंदू समाजात साचलेपणाचे अनेक दोष उत्पन्न झाले होते.
कालोचित स्मृती निर्माण करणं झाले नाही. परीणामी समाज दोषयुक्त व कालबाह्य ठरू लागला. इंग्रजांसाठी ही संधीच ठरली.
सर्व समाज सुधारकांविषयी आदर ठेवून हे स्पष्ट करावेच लागेल कि कालोचित परीवर्तन करण्यासाठी सुधारकांच्या मागण्या या इंग्रजांना राष्ट्रीय आंदोलन क्षीण करण्यासाठी दारूगोळा पुरवत होत्या.
राजाराम मोहन राॅय, यांच्यापासून कोणीही याला अपवाद नव्हते. यांची पिडा खरी होती पण सामाजिक सुधारणेत मागास इंग्रज हे यासाठी योग्य नाहीत ह्याचे भान मात्र या धुरीणींना राहीले नाही.
पण याला एक द्रष्टा समाज धुरीण अपवाद होता. त्यांचे कार्य स्वातंत्र्य सैनिक म्हणून नव्हते पण स्वातंत्र्य व नंतरचा आज पर्यंतच्या भारतासाठी दीपस्तंभ ठरले. संघर्ष करतानाही एकात्मतेची वीण ज्यांनी उलट अधिक घट्ट केली व म्हणून त्याचे मोल या ७५ वर्षांसाठी सर्वात जास्त आहे. ते महर्षि म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.
काय आहे त्यांचे योगदान? हे पुढील लेखात.
सुनील देशपांडे
Article (50/n).
Comments
Post a Comment