वैश्विक सहजीवनासाठी हिंदू विचार

लेखांक ५२* 


*वैश्विक सहजीवनासाठी हिंदू विचार.*


आज ११ सप्टेंबर रोजी समस्त जगाला भेडसावणाऱ्या एकात्म, वैश्विक सहजीवन कसे निर्माण होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत दिले. तो हा दिवस. म्हणून हिंदूसाठी, व भारतासाठी परम पवित्र दिवस. 


मानवतेची सनदच विवेकानंद यांनी त्या दिवशी सर्व आधुनिक जगाला  दिली.पण सनद दिली तरी कशी दिली? 'आम्ही तर केवळ भारवाही' या भावनेने दिली. नवीन पंथ, मी नवीन प्रेषित या भावनेने नाही, तर ही जीवनमूल्ये जो समाज, जे राष्ट्र सनातन काळापासून जगत व जगाला शिकवत आले आहेत, त्या मुल्यांना फक्त समोर ठेवतो आहे या भावनेने मांडली.


वैश्विक सहजीवनात किती अत्यावश्यक अशा गोष्टी किती सहज सोप्या शब्दात सांगितल्या.

या मांडणीची विश्वाला किती गरज होती, किती तहानल होत विश्व या अमृतकणांसाठी, हे विवेकानंदांचे भाषण संपल्यावर न थांबलेल्या टाळ्यांनी लक्षात आणून दिले.


सर्व साधारणपणे तीन विचारधारांनी संपूर्ण विश्वाला कवेत घेणार तत्त्वज्ञान आम्ही आहोत असे सांगितले व त्यासाठी कार्यपध्दती म्हणून पंथ मांडले.

पण जगाची अवस्था मात्र भिक नको पण कुत्र आवर अशी झाली. ख्रिश्चन पंथ आला पण येशूला शरण जा तरच.... असे सांगू लागला व शांती संदेशासाठी तलवारी निघाल्या. इस्लामनी वैश्विक बंधुभाव सांगितला पण मुस्लिम होण्याच्या अटीवर. परत रक्ताचे पाट वाहिले. कम्युनिझम नावाचा पंथ तर रोज क्रांती ही तलवार घेऊन आला व जग भेदरून गेले असा रक्तपात करून गेला.


विवेकानंद यांच्या शिकागो भाषणा नंतरचा तिसरा पंथ होता पण मूळ वैचारिक रोग एकारलेपणातूनच घेऊन आला होता.

 पण विवेकानंदानी हिंदूत्व सांगितले व भारतभूमी या प्रयोगशाळेतील प्रयोग आहे असे सांगितले. व जगाला कळले एषा पन्था.

 

विवेकानंदानी हे समजावून सांगितले की Tolerance विश्व सहजीवनासाठी पुरेसा नाही तर परमत आदरही हवा व ते मतही सत्याकडेच प्रवास करते हा विश्र्वास हवा. सर्वे नमस्कार: केशवं प्रति गच्छति. हा तो भाव ज्यामध्ये विश्व कल्याण व शांतता सामावली आहे. उद्विग्न मन शांतता आणू शकत नाही.


व फक्त हे सांगण्यासाठी नाही तर भारताने हे सत्य आचरून दाखविले. अगस्ती ऋषिंनी जगाला तलवार नाही तर वस्त्र दिली व व्यापारी लोकांनी व्यवसायासाठी मार्ग दाखवला. एकारेलेपण शिकवलेच नाही.


विवेकानंदांनी समजावून सांगितले की या विविधतेत एकात्मतेचे सूत्र आहे. हे विविध रंग संगतीत आहेत, विसंगत नाहीत.

त्यांनी सांगितले This Universe is cosmos not choas.

ही वैश्विक सहजीवनाची सनद म्हणजे ११ सप्टेंबरचे स्वामी विवेकानंद यांचे शिकागो धर्म परिषदेतील भाषण.


शिकागो विश्व व्यासपीठावर भारत.

जगाला भारताने दिलेल्या महान देणग्यांपैकी एक.

हिंदूपण ज्यात पंथाचा अभिनिवेश नाही, मी सोडून सर्व असत्य हा भाव नाही, चराचर सृष्टी ज्या नियमांनी बनली ते नियम म्हणजे धर्म ( innate Laws). हेच सनातन सत्य जे भारतीय हजारो वर्षे जगत आले, विविधता ही एकात्मतेची शत्रू नाही तर शक्ती आहे हेच सत्य विवेकानंदांनी भारताच्या वतीने, हिंदूच्या वतीनं सांगितले व जगालाही पटले.


तोच हा दिवस. आनंदाचा पण हिंदू समाजासाठी जबाबदारीचा.

चला विश्वकल्याणाच्या समग्रतेच्या विवेकानंद विचरित हिंदू मार्गावरून अधिक गंभीरपणे चालू यात.

 *निर्माणोके पावन युग में हम चरीत्र निर्माण न भूले

स्वार्थ साधना की आंधी मे वसुधा का कल्याण न भूले.

सुनील देशपांडे
Article (53/n).
Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन