वैश्विक तत्वज्ञान व व्यवहाराची सांगड.

लेखांक ५३*

स्वामी विवेकानंद यांनी हिंदू समाजाला आपले उद्दिष्ट काय? हे शिकागो धर्म परीषदेत सांगितले, तरीही हे व्यवहारात उतरविणे आवश्यक होते. अन्यथा ते वैश्विक चिंतन हे पराभूतांचे आरण्यरूदन ठरले असते.

स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगिनी निवेदिता,लो टिळक  स्वातंत्र्यवीर सावरकर  व तसे सर्वच जणांचे मौलिक चिंतन हे आरण्यरूदनच ठरले असते.

परंतू त्या सुमारास देशामध्ये कार्यकर्ता निर्माण ही प्रक्रिया सुरू झाली होती व त्यामुळे या अद्वितीय चिंतकांचे चिंतन प्रत्यक्ष व्यवहारात उतरवणं हे शक्य होणार होते.

विचारा शिवाय आचार व आचारा शिवाय विचार हे पंगू असतात. पण २० व २१ व्या शतकात याची जोडणी झाली व उच्च विचार हे शब्दाबरोबरच कृतितून जगाला समजू व दिसु लागले.

संघटित सुदृढ समाज ते महान चिंतन आत्मसात करून कृति करण्यास सिद्ध झाला व सामान्य कार्यकर्ता त्या चिंतनाचा वाहक बनला व परीणाम म्हणून समस्या बनलेली राष्ट्रीय एकात्मता हे बलस्थान बनली.

हे तत्वज्ञान व्यवहारात सिध्द करणारे अनेक कार्यक्रम, उपक्रम, आंदोलने, सेवाकार्ये, योजनापूर्वक व हळूहळू उत्स्फूर्तपणे सुरू झाली व परीणाम स्वरूप आजचे शक्तिशाली राष्ट्र उभे राहण्याची प्रक्रिया ही सुरू झाली.

आधी समाजाचे स्वत्व जागे झाले व नंतर त्याच जागृत स्वत्वाच्या आधारे देश सामर्थ्यशाली करण्याचे प्रयत्न सुरू झाले. व हीच ती भारताची सकारात्मक राष्ट्रवाद ही जगाला देणगी होती.

कसे ते पुढील काही लेखांमधून पाहू यात.

सुनील देशपांडे
Article (54/n).

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन