काशीत आज काय घडले?

काशीमध्ये आज काय घडले?

खर तर एक छोटीशी घटना घडली आहे. एका मंदीराचा जिर्णोध्दार झाला आहे. थोड विशेष महत्वाचे म्हणजे पंतप्रधान स्वतः त्यासाठी आघाडीवर होते. थोडे अजून महत्वाचे म्हणजे हे काम विक्रमी वेळात पूर्ण झाले. अजूनही महत्वाचे म्हणजे  पंतप्रधान स्वतः गंगेत डुबकी मारून पूजा करतात. तसेच अजूनही काही विक्रम झाले असतील, शोधता येतील. जसे ह्या जिर्णोद्धार कामातील सगळे विश्वकर्मा हे पंतप्रधानासोबत जेवण घेतात. अर्थात हे फारच महत्त्वाचे आहे.

फक्त काशी विश्वनाथ. मशिद चर्चेतून बाद विध्वंस विरूद्ध निर्माण.

पण यापेक्षाही महत्वाचे तेथे काही तरी घडले जे विचारात घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे तेथे इतिहास घडला आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण हे ऐतिहासिक महत्वाचे आहे. त्यात पंतप्रधान म्हणाले औरंगजेब आक्रांत होता, आक्रमक होता. या वाक्यामुळे सरकारी स्तरावरून आक्रमक कोण व स्थानिय कोण? यातील फरक स्पष्ट झाला. औरंगजेब हा देशाच्या संस्कृतिच्या विरोधातच नव्हे तर संहारक होता, हे सरकारी स्तरावरून उद् घोषित झाले.
आजपर्यंत आपल व परक यातील फरकावर मूग गिळून बसलेली सरकार नावाची संस्था उघडपणे संस्कृती भक्षक, कोण ? याचे उत्तर घेउन आली.

त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे औरंगजेब आमचा नाही तर कोण आमचा? याचे उत्तर आले, छत्रपती शिवाजी महाराज असे आले. हे काशी विश्वनाथ मंदीर विध्वंस करून मशिद बांधणारा औरंगजेबाविरूध्द संतप्त झालेले शिवाजी महाराज. 

ज्यांना राष्ट्र उभे करायचे असते त्यांना हे कळावे लागते की राष्ट्र म्हणजे काय? संस्कृती काय असते? आपले परके कोण आहेत.? तर राष्ट्र उभे रहाते, विजयी होते व समाज विजीगिषु बनतो. आज हे घडले. मूर्ती भंजक भारतीय संस्कृती विरोधक व जो त्या अक्रांताविरूध्द उभा रहातो तो संस्कृती रक्षक म्हणून राष्ट्रवादी. एका जिर्णोध्दारात हे सर्व सामावले म्हणून आज जे काशीत घडले ते महत्वाचे.

डाव्या इतिहास शिक्षकांनी जी औरंगजेब मंडित इतिहास मांडणी करून समाजाचे सत्व नष्ट केले होते ते नामोहरम करून राष्ट्रभावाची जागृती केली. हेच ते महत्वाचे. आज काशीत घडले.

बुडाला औरंग्या पापी हे वैचारिक दृष्ट्या आज घडलं म्हणून महत्वाचे.

म्हणून आज काशीत काय घडले याचे विश्लेषण आवश्यक आहे.राष्ट्र पुर्नरचनेतील महत्वाचे पाऊल.

सुनील देशपांडे.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन