राष्ट्रीय भाव जागरणाचे प्रयोग
लेखांक ५४*
एखाद्या व्यक्तीने राष्ट्रीय एकात्मता वा ध्येय जागरण, वा स्वत्व जागृतीसाठी जे काम केले ते महत्त्वपूर्ण आहेच हे आपण पाहिले. पण त्याचे महत्त्व तेंव्हाच निश्चित होते ज्यावेळी संपूर्ण समाज ते तत्वज्ञान व्यवहारात आणतो.
त्यासाठी संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन केलेले काही प्रयोग अभ्यासणे आवश्यक आहे. कारण केवळ तत्वज्ञान मांडून भाव जागृती पूर्ण होत नाही. नाही तर उलट आजच ही अचानक राष्ट्रभक्ती व. कशी काय उफाळून आली असे वेडगळ प्रश्न पडतात. जे आपण सहजपणे ऐकत असतो. समाजव्यापी परिवर्तनाची कोणतीही कृती अचानक घडत नसते, तर त्यामागे सातत्याने चाललेले प्रयत्न असतात. ते जाणवत नाहीत पण परिणाम करतात.
आजच हे देशभक्तीने भारलेले वातावरण हे काल परवा निर्माण झालेल नाही तर गेल्या शतकभरापासून चालू असलेल्या समाज जागरणाच्या प्रयत्नांचे दृश्य रूप आहे.
यातील एक पण सर्वात महत्वाचा प्रयत्न म्हणजे संपूर्ण देशाला जे परम वंदनीय आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या त्रिशताब्दी निमित्ताने झालेलं जागरण.
त्या अर्थाने विस्मृतीत गेलेला प्रयत्न. पण राष्ट्र जागरणाच्या सामुदायिक प्रयत्नातील मैलाचा दगड.
यातील बारकावे व साध्य झालेले जागरण विस्तृतपणे पुढील लेखात.
सुनील देशपांडे
Article (55/n)
Comments
Post a Comment