शिव राज्याभिषेकाची त्रीशताब्दी व राष्ट्र भाव जागरण

लेखांक ५५*

६ जून १९७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण होणार होती. हा प्रसंग राष्ट्रीय भावनेच्या जागरणासाठी अत्यंत आवश्यक होता. सामान्यपणे उत्सवी स्वभावाला महापुरूषांच्या जयंत्या मयंत्यांचे फार  अप्रूप असते कि खर म्हणजे त्यात त्या महापुरूषाचे कोणतेच गुणवैशिष्ट्य नसतात.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे महानपण म्हणजे राज्याभिषेक. या देशात हिंदू राजा होतो, असतो हे या दिवशी प्रदीर्घ काळानंतर जगाला उच्चारवात सांगितले गेले. एवढे या दिवसाचे महत्त्व आहे.

पण स्वतंत्र भारतातील  नेतृत्व व इंग्रजी ओंजळीतून घडलेले इतिहास संशोधक यांना सुध्दा हा राज्याभिषेक विस्मरणातच गेलेला हवा होता.

पण समाज संघटित व जागृत झाला असेल तर तो मात्र स्वतःच्या स्वाभिमानाचे विषय सन्मानाने स्वतः जगासमोर मांडतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत तर ते किती आवश्यक होते ते संपूर्ण महाराष्ट्राला व देशालाही माहिती आहे. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी शिवाजी महाराज हे लुटारू होते असे वक्तव्य केले होते.

त्यामुळे खरे महान क्रांतीदर्शी महाराज पूर्ण देशाला कळणे आवश्यक होते. पण ते काम  एक व्यक्ती करू शकणार नव्हता व सरकारे करणार नव्हती. अशा वेळी सर्व देशभर एक विचाराने राष्ट्र जागर करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रातील प्रत्येक घरात शिवराज्याभिषेक व त्याचे महत्त्व पोहचवले. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक राज्याच्या राजधानीत राज्याभिषेक दिन साजरा झाला.

भले शिवाजी महाराज यांचे राज्य महाराष्ट्रापुरते लहान दिसत असेल पण त्यातील हेतू पूर्ण देश स्वतंत्र करणे हाच होता,  व हाच संदेश देशभर पोहोचला. कारण याच छोट्या राज्याने हिंदू समाजाला भयगंड मुक्त केले होते.

शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे महापुरुष होते, हे देशाने प्रथम या प्रसंगी अनुभवले.

भयगंडातून मुक्ति

यातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे दिल्लीतील कार्यक्रमाला जाट नेते चौधरी चरणसिंग स्वतः अध्यक्ष होते. अन्यथा जाट मराठे लढाया असे वर्णन करून जाट हिंदू ह्रदय सम्राट छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्याचे विरोधक होते हे थोतांड इतिहासकार समाजाच्या माथी मारत होते. ते थांबलेच, पण चरणसिंग यांनी शिवाजी महाराज देशाचे नेते होते हे मांडले.

इतकं महत्व होते या घटनेला. ही राष्ट्रव्यापी घटना, प्रयत्न घडला कारण समाज समान ध्येयाने संघटित होत होता. समाज संपूर्ण देशाचा एकात्मिक विचार करू लागला होता व म्हणून काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्व हिंदू समाज शिवराज्याभिषेक कल्पनेने मोहरून गेला होते.

हे जागरण ही त्या प्रक्रियेची एक कडी होती. अशा अनेक कड्या आहेत.

काही पुढील लेखात पाहू.

सुनील देशपांडे

Article (56/n)
Photo courtesy Google

Comments

  1. Nice narration,U can add pamplet and photo of Maharaj, which was distributed at that time.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन