विवेकानंद शिला स्मारक व राष्ट्रीय एकात्मता

लेखांक ५६*

छत्रपति शिवाजी महाराज हे राष्ट्र पुरूष आहेत हे इतिहासाच्या पुस्तकाने शिकवायला हवे होते पण त्यांचा इतिहास जर अर्ध्या पानातच संपला असेल तर काय माहिती मिळणार व काय प्रेरणा?

छत्रपति शिवाजी महाराजांना जर इतिहास पुस्तकात हे स्थान असेल तर लाचित बडफुकन हे नाव ऐकूनही माहिती नसणार. नव्हे, बहुतांश भारताला हे नाव अनभिज्ञच आहे. पण अशा लाचित बडफुखन व पूर्वांचलाचा परिचय उर्वरित भारताला झाला, त्याला एक निर्माण कथा आहे.

अशावेळी ती एक निर्माण कथा माहिती करून घेतली पाहिजे कि जेणेकरून आजची जी राष्ट्रीय एकात्मता जाणवते त्याचा पायाचा दगड कोणता होता.? हे लक्षात येईल.

विवेकानंद शिला स्मारक हे एक भव्य स्मारक भारताच्या दक्षिण किनार्यावर उभे आहे एवढीच ही कथा नाही. तर विवेकानंद जन्म शताब्दी वेळी, विवेकानंद यांनी ज्या खडकावर तप करून भारताची वैश्विक भूमिका समजावून घेतली त्याजागीच त्यांचे स्मारक असावे, असे एकनाथजी रानडे यांना वाटलं, संघ म्हणजेच समाजाला वाटले व ही कथा पुढे सुरू झाली.

विवेकानंद या नावाला व स्मारकाला मेरी, क्रूस, व नावानी विरोध सुरू झाला पण समाज संघटित होत होता म्हणजे काय याचा पहिला साक्षात्कार त्यावेळी पहायला मिळाला.

संघर्ष व विजय दोन्ही हिंदूना अपरिचित गोष्टी येथे परिचित झाल्या व महत्वाचं म्हणजे हा केवळ तामिळनाडूचा विषय न राहता केरळही संघर्षात उभा राहिला. हा परिचय महत्वाचा होता.
राष्ट्रीय एकात्मता प्रयत्नातील मैलाचा दगड.

पण खरी राष्ट्रीय एकात्मतेची वीण घट्ट करणारी योजना पुढे होती. भारतातील प्रत्येक हिंदू कडून एक रूपया मागितला. फक्त बंगाल व तामिळनाडू नाही तर पूर्ण देश उभा राहिला. सीमा नाही, भेद नाही. पैसे मागणारा परिचित नाही, विवेकानंद इतिहासातही चवी पुरते होते. तरीही माझे काम म्हणून सर्व देशाने खिसे रिकामे केले.

पण समाज, देश व सन्मान जागा केला गेला होता. जगाला कळायला वेळ होता पण हिंदूना आत्मभान आले आहे हे जाणकारांना कळू लागले.

हे स्मारक म्हणजे जीवंत समाजाच्या आशा आकांक्षा, अपेक्षा व समान ध्येयाचा प्रस्फोट होता.

तो प्रस्फोट काय आहे तो पुढील लेखांमध्ये.

सुनील देशपांडे

Article (56/n)

Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन