आत्मभान आलेला समाज व समाज परिवर्तन.

लेखांक ५७*


विवेकानंद शीला स्मारक भारताच्या सुदूर दक्षिणेला हिंदू महासागरात उभे राहिले पण त्यातून हिंदू समाजाला आलेल्या आत्मभानाचा सकारात्मक प्रस्फोट सुदूर पुर्वेला असलेल्या सप्त भगिनींच्या परिसरात कसा दिसला.


प्रदीर्घ काळ या पुर्वांचलाने इंग्रजांनी हुशारीने टाकलेल्या बंदीमुळे स्वातंत्र्यानंतरही पाहिले काय तर एकिकडे मिशनरीज तर दुसरीकडे लबाड व्यापारी वा लष्कर. सामान्य उर्वरित भारतीयांशी ना संबंध, ना संपर्क.


इंग्रजांच्या शिकवणी व उर्वरित भारताचा तुटलेला संपर्क व संवाद यामुळे आम्ही हिंदू सोडा भारतीय ही नाही अशी भूमिका या परिसराने घेतली.


दिल्लीला जाणारा माणूस I am going to India असे वाक्य सहजपणे म्हणत होता. शिक्षण फक्त चर्च देणार, त्यामुळे तोंड देखली शैक्षणिक ओळख पण भारत द्वेष मात्र टोकाला गेलेला.


Indian dogs go back या भिंती वर्षानुवर्षे रंगलेल्या होत्या. मिसुरडी न फुटलेली पोर बंदुका हातात घेऊन उभी होती व भारतातील व जगभरातील राष्ट्र विरोधी ecosystem अन्यायाच्या कहाण्या जगभर पसरवायला सिध्द होती.


त्यावेळच्या ग्रेटा, मलाला, चर्च व डावी आघाडी मानवतावादी मुखवटे घेऊन भारतीय नेतृत्वाला सैरभैर करून सोडत होत्या. व कोणतेही मूलभूत चिंतन नसलेल राजकीय नेतृत्व  दबून पिचून गेले होते.


My sympathy goes with Aasam असे म्हणणारे नेतृत्व होते.


या पार्श्वभूमीवर आपण पहाणार आहोत हा प्रस्फोट. समाजाने आत्मभान आल्यावर केलेलं पहिलं सकारात्मक यशस्वी अभियान.


पाहू या पुढील लेखांमध्ये.


सुनील देशपांडे

Article (58/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन