एक देश एक माती

लेखांक ५८*


देश म्हणून पूर्वांचल ही किती गंभीर समस्या होती हे आपण जाणून घेतलं आहे. व त्या पार्श्वभूमीवर आपण समाज जागृती मधून कशा प्रकारे परीवर्तन होते हे समजून घेऊ या.


या ७५ वर्षात समाजात आत्मविश्वास जागा केला तर तो समाज किती शक्तीची कामे किती लिलया करतो याची अनुभूती सध्या आपण घेत आहोत.


विवेकानंद स्मारक उभे राहील्यावर एकनाथजी रानडे यांनी कार्यकर्ता निर्माण व गुणवान जीवनव्रती कार्यकर्त्यांच्या आधारे पुर्वांचलाशी गुणवत्तापूर्ण संवादाची रचना केली. सोपे क्षेत्र निवडून काम असे न करता आव्हानात्मक काम असेल, पण देशाची गरज ह्याचा स्वीकार केला.


ज्ञानेश्वर सातव नावाचा कार्यकर्ता निवडला. सामान्य सेवाभावी कार्यकर्ता प्रथमच पोहोचला. भाषा नाही, वातावरण नाही, ओळख पाळख नाही, वलय नाही. हातात एका शाळेत नोकरीची चिठ्ठी घेउन ज्ञानेश्वर पुर्वांचलात पोहोचले. चर्चची शाळा.


जे करायचे ते काम किती अशक्यप्राय हे पदोपदी जाणवत होते. सर्वत्र निराशेचे मळभ होते. पण मनात विश्वास होता ही माझी माणसे आहेत.


व हळूहळू वेळ जाऊ लागला, विश्वास निर्माण झाला, पुर्वांचल व विवेकानंद केंद्र परस्पर पूरक बनू लागले. स्वतः च्या शाळा निघू लागल्या, अरूणाचल प्रदेशातून आवताण आले.


शिबीर, संस्कार सुरू झाले. गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरू झाले. मूळ आठवू लागले. राष्ट्रगीत गाऊ लागली ती लहानगी मूलमुली.


चर्चला कळलं कि काय घडत आहे. मूले भारतमाता की जय म्हणत आहे.


संयमाची खरोखर परीक्षा होती. हिंदू शब्द नाही, संघ शाखा तर नाहीच नाही.  पण उद्देश स्पष्ट होता. यापुढे going to India नाही, तर  this is India. यशाला सुरवात झाली.


पायाच्या दगडातील एक नाव घेतले, महाराष्ट्र राज्याचे एकात्मतेच्या प्रयत्नातील सहभाग समजण्यासाठी.


असेच अजूनही काही पैलू जाणवून घेणे गरजेचे आहे.पुढील लेखात.


सुनील देशपांडे.
Article (59/n).

Comments

  1. Effective and quality education system is the soul of development. Many of our social leaders started with the schools that would encourage national education. We need to help our children think independently and choose rationally keeping the social good at the centre. The rest is done by them

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन