पूर्वांचलातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रयोग
लेखांक ५९*
पूर्वांचलातील विशेष प्रयत्न जरी विवेकानंद केंद्राच्या कडून सुरू झाले तरी पुर्वांचलाचे प्रश्न व त्याचे गांभीर्य ओळखून काम सुरू केलेले एकांडे शिलेदारही त्यात होते.
सुरवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघकार्य हे आसाम पर्यंत स्तिमित होते. त्यावेळी महाराष्ट्रातील एक शिलेदार प्रचारक भैय्याजी काणे हे आसाममध्ये होते. व स्वतः च्या जोखमीवर मणिपूर मध्ये गेले. सुदूर मणिपूर मध्ये गेले. एकटेच फिरले, राहिले, टिकले. मुलांना शिकवायला सुरुवात केली.
त्याच्याच एकल शाळा झाल्या. पसारा व आदर वाढू लागला. विश्वास संपादन झाला. अशातच एक घटना घडली. मणिपुरी ख्रिश्चन अतिरेक्यांनी भैय्याजींना पकडलं व फाशी देण्यासाठी झाडाला लटकवले. पण पेरलेले उगवलं.गावातील महिलांनी ओळखले, धावून आल्या व सोडवलं. आमच्या मुलांना शिकवतात त्यांना हात लावायचा नाही.
नंतर भैय्याजींच्या कल्पकतेने अजून एक वेढा घेतला. एक देश एक समाज. कुणी कल्पनाही करू शकले नसते असा प्रकल्प सुरू केला.
मणिपुरी, नागा मुल शिक्षणासाठी नाशिकमध्ये आणली, वणवण केली. सर्वांची सोय केली. दरवर्षी हा प्रयोग सुरू झाला.
मुल शिकून देशभक्त बनून, अतिरेक्यांशी लढून मणिपूर ला स्थिरावले. तुम्ही ख्रिश्चन असू शकता पण भारत विरोधी नाही. हे भाव जागरण करून दाखवले.
आजचे मणिपूर, भगव सरकार हि कालची गोष्ट नाही. १९४७ पासून सतत केलेल वैयक्तिक, संस्थात्मक व शेवटी समाजाने केलेलं काम त्यातून जोपासली गेली ही आत्मियता.
आज भैय्याजींच्या नावानं तेथे शाळा सुध्दा आहे.
हे एक उदाहरण मात्र आहे. अशी प्रयत्नांची साखळीची ७५ वर्षे याची ही निर्मिती आहे.
अजूनही काही समजून घ्यावे लागेल. पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (60/n)
Photo courtesy Google.
Yes, we need to explain to those who changed the way of worship that change in worship doesn't change our ancestors and heroes and our culture and our value system.
ReplyDelete