राष्ट्रीय एकात्मतेसाठी जागृक प्रयत्न.

लेखांत ६०*


राष्ट्रीय भाव, एकात्मतेचा भाव आज आपल्या देशात अनुभवाला येत आहे, तो अचानक उद्भवलेल्या पावसासारखा नसून तो या शतकातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे.


इंग्रज जाण्यासाठी व देश ताठ उभा राहण्यासाठी राष्ट्रीय भाव जागरण ही पूर्व अट ठरवून सुरू केलेल्या मागील शतकातील कामाच हे स्वाभाविक फलित आहे.


ज्या पुर्वांचलाचा आपण विचार करीत आहोत त्यात सुरवातीचे भैय्याजी काणे यांच्या सारख्यांचे एकांडे प्रयत्न, विवेकानंद केंद्राचे संस्थात्मक प्रयत्न, या बरोबरीने संपूर्ण समाजाचे अस्तेवाईक संबंध यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये हा माझा देश आहे या भावनेवर जी विघटन वादाची जी राख जमली होती, ती उडू लागली व या एकात्मतेच्या प्रयत्नात स्थानिक जनतेचा सहभाग वाढू लागला.



My home is India. असे प्रकल्प सुरू झाले. यात परत महाराष्ट्रचा पुढाकार होता. पुर्वांचल येथील मुले उर्वरित भारतात घरोघर शिक्षणासाठी राहू लागली, शिकू लागली, स्थानिक घरं व पालक मिळाले, संघाची शाखा मिळाली. इथून तिथून भारत एक हा भाव मिळाला. देशाविरुद्ध हा भाव जाऊन देशासाठी हा भाव जागा झाला.


अशा घरांमध्ये एक घर प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचेही होते. अता सहजपणे सहलीला लोक पूर्वांचलात जातात, त्यामागे या सर्वांचे रक्त ओकून केलेले श्रम आहेत. त्यावर ही एकात्मतेची डवरलेली वेल उभी आहे.


ही फक्त त्रोटक माहिती आहे. यातील एक एक व्यक्ती, प्रसंग, उपक्रम हे कथेचे नव्हे कादंबरीचे, महाकाव्याचे बीज घेऊन उभे आहेत. द्रष्ट्यांना वरवरच्या भेदाखालील आंतरिक एकात्मता माहिती होती व त्या शिदोरीवर हा एकात्मतेचा इमला बांधला गेला आहे.


अर्जुनाची पत्नी, जरासंध, त्याच्या तुरूंगातील स्त्रिया व भगवान श्रीकृष्ण यांनी १००० लग्ने करून केलेली सामाजिक क्रांती याच परीसरातील आहे. शंकरदेवांचा भक्तिमार्ग येथीलच. हे ज्ञात असलेल्या संघटित हिंदू समाजाने प्रयत्न सुरू केले व आजचे यश दिसू लागले.


पण यातील अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे.


ते पुढील लेखांपासून.


सुनील देशपांडे

Article (61/n)

Comments

  1. If one visit arunachal pradesh ,one can observe that all communicate in hindi. The reason explained by a senior woman. She said there are many dialects in the state. They don't understand each other's dialect as. So all speak hindi. Of course it has a great influence of their mother tongue.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन