महत्व कशाला द्यायचे?
आज ६ डिसेंबर आहे. भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण. हिंदू समाजाच्या विजुगिशी वृत्तीच्या कळसाध्यायाचा दिवस.
पण महाराष्ट्रात काल नाशिक मुक्कामी एक साहित्यिक नख-याचा कार्यक्रम पार पडला. व ज्याची दखलही घेतली जाऊ नये अशा तद्दन टपोरी कार्यक्रमामुळे उगाचच अत्यंत पवित्र, गंभीर दिवसावर छछोर चर्चेचे सावट पडले.
अध्यक्षीय बाळबोध भाषण, जावेद अख्तर सारखे स्वस्तातील कवी व विचारवंत शब्दाची चेष्टा ठरणारे एक मानकरी, पवार साहेब, भुजबळ साहेब अशांच्या उरसावर टीका टिप्पणी करण्यात ६ डिसेंबर संपेल.
म्हणून स्मरण देशहित सर्वोच्च ठेऊन उपेक्षितांची लढाई लढलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विविधांगी स्मरण कालोचित ठरेल. समाज व राष्ट्र हितांर्तगत समाज सुधारणा हा अत्यंत प्रगत विचार देणा-या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मरण दिवस म्हणून समाज हितैशी दिवस स्मरू यात.
प्रदीर्घ काळानंतर हिंदू समाजाने आज रोजी पराक्रमाने स्वतः मध्ये जे परिवर्तन केले त्याचा स्मरण दिवस म्हणून आठवू या. अयोध्या पराक्रमावर एखाद्या राजाचे, पराक्रमी सेनेचे, संस्थेचे नाव नाही.
ख-या अर्थाने संपूर्ण हिंदू समाजाचे नाव या पराक्रमाच्या कोनशीलेवर आहे. म्हणून हा दिवस वैशिष्ट्यपूर्ण आहे.
समाजाने समाजाला जागवून मिळवलेला इतिहासातील पहिला विजय आहे.
एवढा दैदिप्यमान दिवस आहे. मोठ्या मनाने तेजाकडे पाहू या. काजवे कोणत्याही रात्री दिसतात.
आजचा दिवस पराक्रम स्मरणाचा, तेजस्वी सूर्याचा आहे हे स्मरू या.
सुनील देशपांडे.
Comments
Post a Comment