भारताचे वैश्विक चिंतन.

लेखांत ५१*

समाज दोष दूर करताना व त्यातही तो परतंत्र असताना कशा प्रकारे भूमिका घेतली पाहिजे हे आपण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे पाहून समजावून घेतले. 

व सवर्ण व अस्पृश्य समाज रूपी बोक्यांच्या घरगुती भांडणात इंग्रज माकडाने हे सांस्कृतिक नवनीत बुध्दीभेदासाठी वापरू नये याची पूर्ण काळजी घेतली.

अशाच त-हेचा अनुभव सांस्कृतिक पटलावर भारताने घेतला. राष्ट्रीय भाव मनात जागा होण्यासाठी, तो अत्यंत तीव्र होण्यासाठी आवश्यक असतो उद्देश. ध्येयवाद. हा ध्येयवाद जेवढा उत्तुंग तेवढ समाजाचं त्यातील योगदान मोठं असतं. हे समाजाच  life mission त्याला कळू देणे हे अत्यंत महत्त्वाचे असे मूलभूत काम आहे व समाजाने ते ध्येय स्विकारले की महान समाज हिमालयाएवढा पराक्रम करतो. हे पूर्ण शतक त्याचा अनुभव आपण घेत आहोत.

हे महान ध्येय आधुनिक काळात ज्याने समाजाला पुन्हा स्मरण करून दिले ते स्वामी विवेकानंद यांनी. व  त्या प्रकाश पाथेयात आपली वाटचाल चालू आहे.पूर्ण शतकभर हे गारूड हिंदू समाज व भारताला कार्यप्रवण करीत आहे. भारतातील राष्ट्रीय भाव, वैश्विक जबाबदारी याची जाणीव भारतीयांना झाली व त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची वीण अधिक घट्ट झाली व एक सुदृढ  राष्ट्र जीवन आज आपण अनुभवत आहोत त्याची आधुनिक प्रेरणा स्वामी विवेकानंद आहेत. म्हणून स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षातील हे स्मरण अत्यावश्यक आहे.

का व कसे? हे पुढील लेखात.

सुनील देशपांडे.

Article (52/n).

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन