पूर्वांचलाची समस्या व संस्कृती संवर्धन.

लेखांक ६१*


पुर्वांचलवर वर एवढा विस्तृत विचार करण्याची खरच आवश्यकता आहे का? असा प्रश्न पडू शकतो. पण हिंदू अल्पसंख्यांक झाला तर तो भाग भारतापासून तुटतो किंवा अलग होण्याची भाषा करतो अथवा त्याला परदेशी पंचमस्तंभीयांचे छुपे अथवा उघड सहकार्य मिळते ही तीनही सूत्रे काश्मीर प्रमाणे येथेही लागू होतात.


सतत आक्रमणांशी झुंझणार्या प्रदेशाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही व त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पुर्वांचला बाबत काहीसे असेच घडले. संपूर्ण देश एक म्हणून संस्कार करणारी जी सांस्कृतिक रचना भारतात होती, त्यात कालोचित रचना न लागल्याने काही भाग हा संपर्क न होता, संवाद न होता राहीला, वर्षानुवर्ष तसाच राहिला व परीणाम स्वरूप इंग्रजांचा चंचूप्रवेश झाल्यापासून व नंतर राज्यच स्थापन झाल्यावर संपर्क व संवाद हीन झालेला पुर्वांचल मूळ सांस्कृतिक धारेपासून सुटू लागला व शेवट तुटल्यासारखा झाला.


पहिला पादरी आला व पुर्वांचल ख्रिस्ती झाला नाही. इतिहास सांगतो की सात फादर्स नी जीवन दान केले तेंव्हा पहिला ख्रिस्ती झाला.


परंतु जे सांस्कृतिक मूल्य घेऊन पुर्वांचल उभा होता त्याचा वर्षानुवर्ष परीपोष होत नव्हता व अशी वर्षानुवर्षे गेल्यावर आजची समस्या उभी राहिली.


आधी संस्कृतीची नाळ तुटली व नंतर देशाविषयी ममत्व संपू लागले. व जोडीला चर्चच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधामुळे अराष्ट्रीय तत्वांना सहजपणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ही उपलब्ध होऊ लागली व हा विषम लढा अजूनच जड होऊ लागला.


पण सकारात्मक विचार, मूळ संस्कृती खोल हृदयस्थ जीवंत असल्याने व सत्य बाजूने असल्याने राष्ट्रवादी शक्ती या असमान लढाई जिंकल्या.


त्यातील एक प्रेरक प्रसंग पुढील लेखात.


सुनील देशपांडे
Article (62/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन