काश्मीरचे विलीनीकरण व शामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान

लेखांक ६६*


संघ राज्य निर्मिती मध्ये संस्थान खालसा करणे या कामात अडचण आणली हैद्राबादच्या निजामाने. पण ते प्रकरण सरदार वल्लभभाई पटेल यांनी कठोरपणे हाताळून मोडून काढले. पण तेथे प्रजा प्रामुख्याने हिंदू होती व परिसरातील राज्ये पण हिंदू होती. काश्मीर प्रकरण पंडित नेहरू यांचेकडे होते. व हाच नेतृत्व फरक या दोन राज्यांतील जनतेचे भवितव्य लिहीत होता. राजा हिंदू असूनही व त्याने विलिनीकरण मान्य करूनही मुस्लिम वेगळेपणा चुचकारण्याच्या नादात सोपी गोष्ट अवघड होत गेली. मुस्लिम अनुनय या भयंकर पापाचे धनी असलेले आपले नेतृत्व यांनी काश्मीर प्रश्न असा लटकत ठेवला.


ज्यांनी नावलौकिकासाठी कधीच काही केलं नाही त्या श्री गुरुजींच्या सहकार्याने राजांच्या मनातील दिल्ली विषयी अविश्वास दूर करून,कसे तरी जम्मु काश्मीर भारतात जोडून घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री प्रेमनाथजी डोगराजी व अन्य प्रतिष्ठित नागरिक बंधुनी गतीने हालचाली करून जम्मू काश्मीर भारताला जोडून घेतले. सामान्य नागरिकांना जे कळत होतं ते स्वप्रतिमा मग्न  सरकार व शिर्षस्थ नेत्यांना कळत नव्हते. इकडे उर्वरित भारतात स्वातंत्र्य तर तिकडे जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तान चे आक्रमण. परत मदतीला जम्मुतील संघ स्वयंसेवक व लष्कर. परत सामान्य देशभक्त हिंदू समाजाने लष्कराच्या खांद्याला खांदा देऊन मृत्यूशी झुंज देत संकट टाळले.


पण शेख अब्दुल्ला यांच्या इच्छेनुसार झालेल्या कराराने एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान अस्तित्वात आले. परत जागृत संघटित देशभक्त हिंदू समाज भारतभरातून काश्मीरी तुरुंगात येऊ लागला. सुदूर बंगालच्या व भारतीय जनसंघाचे अध्यक्ष असलेल्या शामाप्रसाद मुखर्जी यांनी सर्वोच्च बलीदान दिले.
काश्मीरचे परमिटराज या महापुरुषाच्या बलिदानाने संपुष्टात आले.



सामान्य जनतेने आपल्याच सरकार विरूद्ध आंदोलन करून अंशतः बदल घडवण्यास भाग पाडले. शेख अब्दुल्ला ह्या लाडकिच्या लेकाला अटक करावीच लागली.


या ७५ वर्षातील राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांना हे तटपूंजे पण अत्यावश्यक यश मिळाले.


पण कलकत्ता विद्यापिठाचे कुलगुरू राहिलेल्या, फाळणी विरूद्ध उभे राहिलेल्या डॉ शामा प्रसाद मुखर्जी यांचा बळी देऊन हे यश भारतीय  व जम्मू काश्मीर मधील हिंदू जनतेने खेचून आणले.


असे काश्मीर समस्येवर अजून काही. पुढील लेखांमधून.


सुनील देशपांडे.

Article (67/n)
Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन