विघटनवादी शक्ती व काश्मीर प्रश्न
लेखांक ६७*
समाजाला जीवन ध्येय समजावून सांगणे, संघटित करणे, निस्वार्थ बुध्दीने क्रियाशील करणे हे सर्व काम स्वातंत्र्य लढ्या बरोबरच करणारे महापुरुष आपल्या कडे झाले व परीणाम म्हणून नेतृत्वाची अनास्था असतानाही समाजाने स्वतः च राष्ट्रीय एकात्मता अधिक सुदृढ व आधुनिक काळाशी सुसंगत निर्माण होईल ह्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी व्यक्ती, संस्था संघटना, व उत्स्फूर्तपणे समाज यांनी जे प्रयत्न व कार्य केले ते आपण पहात आहोत. पुर्वांचल व अता काश्मीर समस्या व त्यावरील उपाय याच्या आधारे.
काश्मीरचे विलीनीकरण, पाकिस्तानशी १९४८ व नंतरचे सततचे संघर्ष, विघटनकारी करारा विरूद्ध व्यक्ति, समाज व संघटना यांनी केलेले मूलभूत कार्य आपण मागील लेखात पाहिले.
त्यामुळे काश्मीर खोऱ्याचे आज बदललेले चित्र हे संपूर्ण भारताने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे हे लक्षात येते.
पण काश्मीर प्रश्न हा इतका साधा, सोपा सरळ नव्हता. उलट अत्यंत जटिल बनला होता. यात कुराणाने तयार केलेली मुस्लिम मानसिकता, शीर्षस्थ नेतृत्वाला इस्लामी आक्रमतेविषयी असलेली भिती व स्वप्रतिमा मग्न नेहरूंची मानसिकता, डाव्या विचारसरणीच्या विकृत विद्वानांचा देशातील वैचारिक समुहावर असलेला दबाव व हिंदूचा मला काय त्याचे? हा स्वभाव हे सर्व एकत्र येऊन समस्या जटील झालीच होती. शिवाय भरीला नवीन कट्टर इस्लामिक पाकिस्तानचा शेजारही कारणीभूत होता.
पण हिंदू जागरणाची प्रक्रिया सतत चालू राहिल्यामुळे घटत्या हिंदू संख्येच्या मनात कुठेतरी मी सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करीन हा भाव जागा होता. सुदूर खेड्यात २/४ हिंदू घरे सुध्दा उर्वरित भारतीयांच्या संपर्कित रहात होती
मुस्लिम समाजातील सुध्दा देश प्रथम असे मानणार्यांशी संपर्क व त्यांना धीर देणे हेही ह़ोत होते.
काश्मीर प्रश्नावर देशभर अभ्यासगट कार्यान्वित होते. संपूर्ण देश जनजागृती करून जम्मू काश्मीर बरोबर पूर्ण देश उभा आहे हे उच्चरवात सांगत होता. यात्रा, जेल भरो, जागरण, निर्वासितांना सहकार्य, लाल चौकात झेंडावंदन व अशाच उपक्रमांची छडी लावली होती. अमरनाथ यात्रा संपूर्ण हिंदू समाजाने प्रतिष्ठेची केली. केंद्र सरकारच्या मानसिकतेवर या सर्वाचा सकारात्मक परिणाम होत होता व तेथील अवघड परीस्थितीचा अधिकच घोर परीणाम होत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने ठाम भूमिका घेण्यास सुरुवात केली. संसदेने अधिकृतपणे काश्मीरचे भारतामधील विलीनीकरण संपूर्ण आहे ही भूमिका अधोरेखित केली व युनोमध्ये पण ही भूमिका उच्चरवाने मांडली.
विरोधी पक्ष नेते असूनही युनो समोर काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे ही भूमिका मांडली ती अटलबिहारी वाजपेयी यांनी. एक महत्त्वाचं पाऊल.
जम्मू व लडाखमधील आक्रमक हिंदू जागरण व काश्मीर खोऱ्यात संपर्क याचा परिणाम सरकारी स्तरावर होत होता.
तरीही हे बरच काही केलेलं समस्येच्या तीव्रतेच्या मानाने फार कमी होते. कारण विघटनवादी शक्तींची मूळ प्रेरणा असलेला इस्लाम तेथे ठाण मांडून होता. परीणाम स्वरूप आलेल संकट व त्या वर केलेली मात पुढील लेखात पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (68/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment