काश्मीरच्या दुर्दैवी दशावताराचे फेरे परत निर्वासित
लेखांक ६८*
स्वातंत्र्योत्तर भारतात जम्मू काश्मीर लडाख मधील फक्त काश्मीर खोरे हेच म्हणजे काश्मीर व अब्दुल्ला घराणे हा एकमेव काश्मीरचा आवाज असे सतत मानल्या गेल्यामुळे काश्मीर विलीनीकरण, ४८ च्या लढाईतील विमानतळ उभारणी, शामा प्रसाद मुखर्जी यांचे हौतात्म्य याला मर्यादित यश मिळाले व काश्मीर ही समस्या म्हणून कायमच राहिली.
या अनुनयवाद प्रकारच्या केंद्र सरकाच्या वर्तनामुळे इस्लामसाठी काश्मीर खोरे हे दारूल इस्लाम बनून गेले. व जम्मू व लडाख ही नावडतीची पोर बनली.
पण त्याहून भयंकर म्हणजे दारूल इस्लाम सदृश परिस्थिती बनलेल्या काश्मीर खोऱ्यातील उर्वरित हिंदू समाजाची अवस्था कोणीच वाली नाही अशी झाली. ज्या केंद्र सरकारच्या भरोशावर रहावे ते तर कु-हाडीचा दांडा गोतास काळ निघाले व हळूहळू काश्मीर खोऱ्यातील हिंदूंसाठी दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले.
सुरवातीला वैयक्तिक वाटणारे इस्लामिक आक्रमण हळूहळू समुह स्वरूपात होऊ लागले. इस्लाम विरूद्ध इस्लामेतर असे स्वरूप त्याला प्राप्त झाले होते. जणूकाही वाघ बकरीचा संघर्षच होता. व दुर्दैवाने इस्लाम शब्द आला की कापरं भरणार असं तकलादू केंद्र सरकार अस्तित्वात होते.
देशभक्त हिंदू समाजाला काश्मीर खोऱ्यात३०/३५ वर्षातील दुसर्या फाळणीला तोंड द्यावे लागले. आपल्याच घरातून निर्वासित व्हावे लागले.
उर्वरित देश फक्त सेवा देऊ शकत होता. ती दिली. दु:खाला वाचा फोडण्यासाठी व्यासपीठ देऊ शकत होता. दिलं. तेथे जाऊन सत्याग्रह करू शकतं होता. केले. थोडा परिणाम झाला. निदान निर्वासितांच्या वाट्याला उर्वरित देशाची ओ तरी आली.
असुनी थोर मालक घरचा काश्मीरी हिंदू दिल्लीतील निर्वासित छावणीत. हे चित्र फाळणीचे नाही तर स्वतंत्र भारतातील आहे.
पण ते निर्वासितांचे दुःख, त्या अपमानाच्या कथा, त्या अस्तित्वहीन जगण्याच्या कथा ह्या या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षातील आहेत. आपल्याच घरात उपरे झालेल्यांच्या कथा आहेत त्या.
त्या जाणून घेतल्याच पाहिजेत. पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (69/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment