नागा राणी गाईडिंगल्यू व राष्ट्रीय एकात्मता.



लेखांक ६२*


पुर्वांचलाची परिस्थिती आपण समजून घेतली आहे. अनेक वर्षे हे क्षेत्र अलगाववाद्यांना, चर्चला आंदण दिल्यासारखे झाले होते व त्यामुळे जो देश विरोधी आवाज देईल तोच त्या प्रदेशाचा आवाज आहे असं भासवले जाई, माध्यमांद्वारे ठासले पण जाई.


त्यामुळें क्षीण स्वरूपात का होईना तेथे चर्च शिवाय मूळं निवासी आहेत, त्यांचे जीवन, मूळ संभाळून आहेत हे उर्वरित भारताला माहिती नव्हतं व माहिती करू द्यायचेच नाही हा कटही होता.


परंतू ज्यावेळी पूर्वांचल मध्ये India my home, एकल विद्यालय, वनवासी कल्याण आश्रम, विश्वं हिंदू परिषद, पूर्वांचल परिषद पोहचू लागले, विश्वास वाढू लागला, सहली निमित्ताने लोकांचा सहवास व सरमिसळ होऊ लागली त्यावेळी समाजाला ह्या मूळ संस्कृती धरून टिकवून ठेवलेल्या नागरिकांचा स्वाभाविक शोध लागू लागला.


त्यातील एक नाव राणी गाईडिंगल्यू. नागा मूळ निवासी. चर्चला शरण न गेलेल्या नागा निवासींची राणी. 


संपूर्ण देशाविषयी आत्मिय भाव भरलेला. सांस्कृतिक पाथेय घेऊन चाललेल्या. संधी मिळताच संपूर्ण देशात पसरलेल्या जनजातीय बांधवांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने देशभर काम सुरू केले.


स्थानिक पूर्वांचल म्हणजे फक्त लाल डेंगा नाही हे पूर्ण देशाला कळले. एकात्मतेचे सुक्ष्म धागे परत घट्ट होऊ लागले.


अशातच राणींची पंच्याहत्तरी देशभर साजरी व्हावी असे संस्था व कार्यकर्ते यांना वाटले. योजना सुरू झाली.


समिती बनवावी, देशभर उपक्रम व्हावेत, पूर्वांचल कळवा असा उद्देश होता. पण फक्त असे ठरत आहे हे कळताच चर्चच्या डोक्यांत धोक्याची घंटा वाजली. कार्यक्रम सुरू होण्याआधीच विरोध सुरू झाला.


ही कोण राणी? नागा ख्रिश्चनच. Times of India मधून या  पंचाहत्तरी ला विरोध करणारा लेख. दिल्ली दरबारात विरोधासाठी दबाव व. सर्व खेळ सुरू झाले.
नागांचे सूर्यमंदिर हाफलाॅंग मध्ये. पूजा करून आलेले नागा बांधव. चर्चचा जळफळाट यामुळे आहे की नागा बांधवांनी विघटन नाकारून आपले मूळ स्विकारले. भारत माता की जय चा जयजयकार पुन्हा दुमदुमला. हिंदू समाजाच्या सातत्यपूर्ण एकात्मतेच्या प्रयत्नाला लाभलेले लोभसवाणे फळ.


पण जागृत समाज, देश, संस्था, व सेवेने बदललेले पूर्वांचलाचे भवताल, यांनी कमाल केली. राणी गाईडिंगल्यू नाव, मूळ नागा संस्कार, पूर्वांचल खरा कसा? हे पूर्ण देशाला कळले. चेन्नई पासून दिल्ली पर्यंत कळले.


एकात्मता निर्माण करण्याला विरोध किती हे ही कळले व सत्य विजयी होते हे ही कळले. म्हणून हा प्रसंग महत्वाचा.


असाच अजून एक सामूहिक प्रयत्न समजून घेऊ पुढील लेखात.


सुनील देशपांडे

Article (63/n)
Photo courtesy Google


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन