इस्लामी काश्मीर व जम्मू आणि लडाख

लेखांक ७०*

कोणत्या भयंकर परीस्थिती मधून काश्मीर खोऱ्यातील अल्पसंख्याक हिंदू समाज जात होता हे आपण पाहिले. पण हे एखाद्या समाजाचे असमंजस क्रौर्य म्हणावे एवढे साधे नव्हते तर भारताकडून संरक्षण मिळवून स्वतः च्या कल्पनेतील इस्लामी काश्मीर निर्माण करणे या मोठ्या कटातील ती फक्त प्यादी होती.

काश्मीरात बाहेरून कोणी येऊ शकतं नाही हे कायद्यानेच करवून घेतले पण जम्मू व लडाख मुस्लिम बहुल करण्याची कटकारस्थाने मात्र सुरूच ठेवली. त्या दोघांवरही अन्याय सुरूच ठेवला. जर काश्मीर, व जम्मू लडाखला स्वातंत्र्य हवे असते तर त्या तिघांना तरी समान सुविधा वा प्रगती मिळायला हवी होती. पण तसे घडत नव्हते. तिथे फक्त इस्लाम लाच विशिष्ट दर्जा होता व बाकी सर्व काफरच होते.

पण या दोन काफर विभागांमुळे राष्ट्रीय एकात्मतेची वीण टिकून होती व ती उर्वरित देशातील हिंदू संस्था संघटनांना घट्ट करता येत होती. व घडलेही तसेच.

लडाखमध्ये सिंधू महोत्सव होऊ लागला. अमरनाथ यात्रेला जीव धोक्यात घालून हिंदू धार्मिक समाज जाऊ लागला.

देशभक्त विचारवंत काश्मीर अभ्यासगट स्थापून काश्मीरीयत व इस्लाम भिन्न आहेत, हे उच्च रवात सांगू लागले व राजकीय पटलावर प्रथम काश्मीर खोरे हे केंद्राच्या माध्यमातून भरपूर ऐषोआरामी जीवन जगणारी चार दोन घराणी विरूद्ध सामान्य वैफल्यग्रस्त मुस्लिम समाज हे गृहितक समोर आले. अनेक सेवाभावी हिंदू संघटनांच्या वतीने एकल विद्यालये काश्मीर खोऱ्यात चालू होती व राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार देण्याचे दीर्घकालीन काम शांतपणे चालू होते.

मुस्लिम समाजाला अता हिंदू विरहीत काश्मीर खोऱ्यातील अतिरेकी क्रुरतेचा झटका बसू लागला व थोडे ठेच लागून शहाणपणही येऊ लागले होते.

पण या प्रश्नाची खरी तड लागली कारण संपूर्ण देश संघटित व राष्ट्रीय भावनेने प्रेरीत होत होता. ती १००/१५० वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलशृती आहे. काश्मीर प्रश्न काश्मीरचा नाही संपूर्ण देशाचा आहे हे संघटित व ध्येयवादी देशाने सांगितले व प्रत्यक्ष करून दाखवले.

यशाची विस्ताराने मिमांसा पुढील लेखात.

सुनील देशपांडे
Article (71/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन