आले समाजाच्या मना व काश्मीर प्रश्न सुटला
लेखांक ७१*
सर्वार्थाने विकृत समस्येत आडकलेला काश्मीर प्रश्न असा सुटला तरी कसा काय? इतका गुंता न कापता, तोडता सुटला कसा काय?
जसे दो-याचा गुंता सुटण्यासाठी योग्य टोक हाती यावे लागते, तसेच देशाच्या समस्यांचे सुध्दा असते. स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून सर्व महर्षि यावर चिंतन, मनन व कृति करत होते. यातील सर्वात अवघड पण अत्यावश्यक कृति केली, डॉ हेडगेवार यांनी.
हिंदू हे भारतीय राष्ट्रीयत्वाचे नाव आहे हे जाणले, त्या नावानी हाक मारली, त्या हिंदूत्वाच्या लांब रेषेत सर्वांना आणुन, छोट्या छोट्या अहंकाराच्या रेषा त्यात जाळून टाकल्या. जसे निर्वासित हे काश्मीरी पंडीत हे नसून, काश्मीरी हिंदू आहेत हे संपूर्ण देशाला समजावून सांगितले. देश कुटुंब आहे व जसे कुटुंब चालवणे हे शेजा-याची नाही तर कुटुंबाची जबाबदारी असते तसे राष्ट्र सुचारू रूपात चालेल हे पहाणे व त्यासाठी वाटेल ते काम करणे हे समाजाचे, त्या नागरिकांचे कर्तव्य आहे. व यासाठी राष्ट्रव्यापी संघटन आवश्यक आहे हे डॉ हेडगेवार यांनी जाणले व हे सर्व केले. व स्वाभाविक काश्मीर खोरे समस्या ही संपूर्ण देशाची झाली.
गावोगावी कार्यकर्ते फिरत राहिले काश्मीर समस्या व आजची स्थिती सांगत राहिले. संपूर्ण देशाला प्रश्न कळला, काय व्हायला पाहिजे हे ही कळले. सरकार घाबरत असेल पण संघटित हिंदू समाज हा क्रूर इस्लामला घाबरत नाही हे संघटित हिंदू समाजाने संपूर्ण देशाला व जगाला सांगितले. परिणामतः काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी देश सिध्द झाला.
अडचणीतून बाहेर पडून व त्यावर मात करून श्रीनगरमध्ये सत्याग्रह केले, लाल चौकात तिरंगा ध्वजारोहण केले. तीन लाख निर्वासित हिंदू समाजासाठी संपूर्ण देशातील हिंदू समाज उभा राहिला व दोन्ही हातांनी भरभरून दिले.
वेळ व संधीचा दबा धरून देश वाट पाहू लागला. समाजाने जे करायचे ते पूर्ण झाले होते. काश्मीर अता भारतापासून कोणीही दूर करणार नव्हते.
काश्मीर खो-यात अशी १००/१५० गावात एकल विद्यालये सेवा भारतीच्या वतीने चालतात. संघाची विश्वासार्हता बोलते. हीच ती सकारात्मक शक्ती आहे जी संधी मिळताच भारत माता की जय म्हणत आहे. ही लहान मुले भारतातील सर्व भाषांतील गाणी म्हणतात. मी भारताचा/ची अंगांग घटक आहे याचा अनुभव घेतात.
पण येथून पुढील कामे समाजाच्या विश्वासाने केंद्र सरकारने करायची होती.
सरकारला काय करावे हे सांगून झाले, संपूर्ण देश पाठिशी आहे हे सांगून झाले.
अता सर्वंकष परीवर्तनासह काश्मीर समस्या सोडवण्यासाठी देश सिध्द झाला.
घडले कसे हे पुढील लेखात.
सुनील देशपांडे.
Article (72/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment