काश्मीर समस्येचा सुखान्ताकडे प्रवास
लेखांक ७२*
अशा अनेकविध अंगांनी काश्मीर समस्येवर संपूर्ण समाज, व देश काम करू लागल्यामुळे व तसे वर्षानुवर्षे काम करत राहिल्याने सतत भेदरलेली सरकार ही यंत्रणा सुध्दा काही धीट निर्णय करू लागली. जशी कि निवडणूका घेऊन लोकनियुक्त सरकारे येऊ लागले व राष्ट्रीय राजकारण करणा-या पक्षांवर व त्या राष्ट्रीय राजकिय पक्षांचा स्थानिक कार्यकर्ते व वातावरणा वरील समाज दबाव वाढत गेला. यात लष्कराचा सकारात्मक प्रभावही काम करत होता.
मेजर सोमनाथ शर्मा हे स्वतंत्र भारतातील पहिले परमवीर चक्र विजेते वीर हे १९४८च्या काश्मीर मधील संघर्षात श्रीनगरमधील विमानतळ रक्षणार्थ हुतात्मा झाले होते. लष्करातील पहिले सर्वोच्च बलिदान या काश्मीरी समस्येवर उपाय शोधताना झाले.
परंतू वैचारिकदृष्ट्या, तसेच अतिरेकी व इस्लाम प्रणित असंवैधानिक रचना या विरोधात केंद्रांतील सत्तेत असणारा पक्ष, काॅंग्रेस फार काही करत नव्हता. व त्या पक्षाच्या मनोधारणेत अशा संघर्षाच्या कल्पना रूजतच नव्हत्या.
पण या सर्व संघर्षमय कालखंडात ईस्लामचे कडवे व विकृत रूप कुठेतरी सामान्य काश्मिरी मुसलमानांनासुध्दा भयभित करू लागले होते. रक्त ला चटावलेल्या इस्लामिक अतिरेकाला हिंदू समाजच नाही तर मग मुस्लिम विरोधकही सहन होईना झाला. या संधीकालात २०१४ सालापासून या सर्व राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रयत्नातील एक जी हरवलेली कडी होती, ती म्हणजे केंद्रस्थानी समजूतदार राजकीय नेतृत्वाची उणीव. तीसुद्धा भरून निघाली.
जो पर्यंत राजकीय नेतृत्व उभे रहात नव्हते तो पर्यंत काश्मीर समस्या हा विषय स्वाभाविक शेवटाकडे जाऊ शकतं नव्हता. कारण या एकात्मतेच्या मधील बाधा असलेले सर्व तांत्रिक मुद्दे, करार हे राजकीय होते.
इस्लाम, अतिरेकी व विषयात अन्य सामाजिक क्षेत्रांनी काही कामे केली व किमान संवाद व महत्वाचं म्हणजे संपूर्ण देश पाठीशी उभा राहिल हे पाहिले.
प्रत्यक्ष समस्येचं शेवट करणारं राजकीय नाट्य पुढील लेखात.
सुनील देशपांडे
Article (73/n)
Comments
Post a Comment