विवेकाची ऐशीतैशी
विवेकाची ऐशीतैशी
अंनिस मध्ये याहून काही वेगळं घडण अपेक्षित नव्हते. पण आत्ता भांडणारे दोन गट ही समस्या नाही. राजकारणात घराणेशाही विरूद्ध पिंका टाकणा-या स्वघोषित प्रबुद्ध जमातीचे पाय किती मातीचे आहेत ही ती समस्या आहे.
तात्पुरती मलमपट्टी होईलही. पण भांडणा-या तरूणांपेक्षा त्यांना नासवणा-या भोंदू सुधारकांचा हिशोब तपासणे गरजेचे आहे.
अंनिस व डॉ दाभोळकर म्हटल्यावर घळघळणारे, अनिल अवचट म्हटल्याबरोबर ताठ उभे रहाणारे यांना समाजातील संस्था जीवन, त्यात व्यक्ती महात्म्याचे शून्य महत्त्व व म्हणून या सामाजिक पवित्र गायींचे योग्य मूल्यमापन आरशासारखे दाखविण्याची गरज आहे.
अंनिस ट्रस्ट, त्याचा ताबा मुलांकडे गेला कसा? डॉ दाभोळकर यांना काहीच श्रेय नाही का? गुणगान करणा-यांनी करावे पण डॉ दाभोळकर यांना आरसा म्हणून गाडगे महाराज व त्यांच्या ट्रस्टची घटना दाखवावीच लागेल ना? ( वडील डॉ दाभोळकर यांना)
अनिल अवचट यांचेही कार्य, संवेदनशील मन, अफाट प्रतिभेचे साहित्य महानच आहे पण,.......
व्यसनमुक्ती ट्रस्ट वतीने मुलगी बोलते. थोडे दिवसांनी संस्था जीवन म्हणून देश काय शिकेल?
बाबा आमटे यांचे कार्य बघता बघता कुटुंब सम्मेलन कधी झाले व कुटुंब वाद ही सामाजिक समस्या कशी तयार झाली याचे काही श्रेय बाबांच्या खात्यात टाकायचे कि नाही.
समस्या ही आहे.
विचारी समाजाला विचार करायचा आहे. समाज हीत कोण पहाते, कशात आहे?
गाडगे महाराजांच्या ट्रस्ट मध्ये, सावरकरांच्या अभिनव भारत विलीनीकरणामध्ये, डॉ हेडगेवार यांनी स्थापलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये. पहा विचार करून.
सुनील देशपांडे
Comments
Post a Comment