कश्मीरीयत म्हणजे भारतीयत्व.
लेखांक ७४*
हे आश्चर्य चकित करणारे घडलं असल तरी अचानक मात्र घडलं नव्हतं हे आपण पाहिले. संपूर्ण हिंदू समाज, वेगवेगळी सरकारे, त्यावरील संपूर्ण समाजाचा दबाव, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने कालांतराने घेतलेली ठाम भूमिका या सर्वांचाच परिणाम होत, होत वरील आश्चर्य घडले.
३७० जाण्याचे काय काय परीणाम होत आहेत हे पहाणे फार महत्त्वाचे आहे. साधारणपणे खिलाफत चळवळी पासून मुस्लिम समाजाला धमक्यांच्या आधारे नवनवीन राष्ट्र विघातक मागण्या मान्य करून घ्यायची सवय लागली होती त्याला जबरदस्त सुरूंग लागला. ३७० कलम हे वज्रलेप आहे असा मुस्लिम समाजाचा व देशा विदेशातील अनेकांचा व सामान्य समाजाचा समज धुळीस मिळाला. सुमारे १५०/२०० वर्षांपासून मानगुटीवर बसलेलं मुस्लिम अनुनयाचे भूत उतरण्यास सुरुवात झाली.
याच जोडीला तीन तलाक बंदीचा कायदा झाल्यामुळे तर एक पाऊल पुढे पडले. तीन तलाक प्रकरणाने समाजात मोठे परीवर्तन होणार आहे असे नाही. पण आमचा शरीया अस्पर्श आहे हे गृहितक साफ कोलमडून पडले. ही गोष्ट सर्वात महत्वाची घडली. संविधानात एखादी गोष्ट चिकटवून घेऊ व ती वज्रलेप आहे असे भासवू हा भ्रमही निघून गेला. आमचा व्यक्तिगत कायदा या अहंकाराला ठेच बसलीच पण मुस्लिम म्हणून वेगळी चूल आता औट घटकेचा खेळ आहे हे मुस्लिम समाज समजून चुकला आहे.
तसेच CAA व अन्य देशांतील पिडीत अल्पसंख्यांक यांचे पुनर्वसन हे निर्णय होऊ शकले ते सुध्दा काश्मीर समस्या सोडविल्या मुळेच.
३७० कलम उडाल्याने काश्मीर खो-यात व्यवहारीक पातळीवर सर्व भारतीय सहभागी होऊ शकतील, विवाह संबंधापासून अनेक सुविधा उत्पन्न होतील. पण खरे महत्व आहे बौद्ध,शीख व हिंदू समाज बहूल असलेला जम्मू लडाख हे समान नागरी सुविधांचे हक्कदार बनतील. आदी शंकराचार्य यांची जन्मभूमी केरळ ते अंत्यभूमि काश्मीर ही एकात्म भारतमातेचा जयजयकार करील.
केरळ पासून काश्मीर पर्यंत एकात्मतेचा भाव अर्वाचीन काळात निर्माण केलेले महर्षि म्हणजे आदी शंकराचार्य. ते पेरलेले वैचारिक चिंतन आज उगवत आहे.
अजूनही महत्वाचा फायदा म्हणजे या नगर पंचायती निवडणूकांमध्ये पिडीपी, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांना काश्मीर खोऱ्यात प्रथम नाकारले जाऊन सामान्य नागरिक राजकीय ओळख निर्माण करू शकला. सामान्य काश्मीरी नागरिक ह्याला स्वतः ची ओळख झाली.
सीमा सुरक्षित होत चालल्या आहेत. पुर्वांचल असो वा जम्मू काश्मीर लडाख असो. त्या अर्थाने ही राष्ट्रीय एकात्मतेची वीण अधिक घट्ट होत गेली.
गत १०० वर्षातील राष्ट्र संक्लपने वर झालेलं मनन चिंतन आणि कृति याचा स्वाभाविक परीणाम म्हणून हे परीवर्तन दिसत आहे.
असेच राष्ट्रव्यापी, देशाच्या एकात्मतेची आंतरीक वीण घट्ट करणारे आंदोलन आपण पाहू, पुढील काही लेखांमधून.
सुनील देशपांडे.
Article (75/n)
Comments
Post a Comment