पूर्वांचलातील एकात्म राष्ट्र भाव जागरण


लेखांत ६३*


पूर्वांचलाच्या समस्येचे गांभीर्य आपण पाहिले. त्याचे वेळोवेळी जे प्रत्यंतर येत असे ते उदाहरण रूपाने पाहिले. पण यातून एक धडा देशाला मिळाला कि जर समाजाने सकारात्मक पध्दतीने समस्येचा पाठपुरावा केला तर समस्या सुटतेच. समस्येचा जन्मच मुळी हितसंबंधींच्या खोटेपणातुन झालेला असतो.


पुर्वांचलातील सातत्यपूर्ण  ५०/६० वर्षांच्या समाजाच्या संघटित प्रयत्नांना मोठे यश प्राप्त होत आहे.


भारतभरातून कार्यकर्ते येथे जातं आहेत, सतत ५० वर्षे. शाळा काढतात , शिकवतात, वसतिगृह काढतात, छोट्या छोट्या पाड्या वस्त्यांवर दवाखाने काढतात, देशभरातून तरूण डाॅक्टर तेथे जातात, तिथलेच होऊन राहतात. आता तर महाराष्ट्रातील हेडगेवार रूग्णालय त्या परिसरात अद्ययावत रूग्णालय काढते.

पुर्वांचलातील वैद्यकीय सेवेचे एक दृश्य


या बरोबरीने उर्वरित भारतातील लोक  तिकडे सहली काढतात व निसर्गाबरोबर तेथील लोकांच्यात मिसळतात. लोकांना वाचतात. व जाणारे भारतीय आणि स्थानिक लोक एकमेकांना समजून घेतात कि आपण एकच आहोत.


तसेच येथून मुल मुली उच्च शिक्षणासाठी देशभरात येऊन राहतात, शिकतात, संस्कृती समजून घेतात व त्यामुळे अता पूर्वांचलाला उर्वरित भारत परका वाटत नाही, कि उर्वरित भारतीयांना पूर्वांचल. हेच काम करणे आवश्यक होतं.

 विसरलेली ओळख परत करून घ्यायची होती. नाती घासून पुसून घ्यायची होती. हे महत्वाचे काम झाले.


यशाची एखादी कसोटी कोणती? CAA. कायदा. जर पुर्वीचा पुर्वांचल असता तर? सर्वत्र युद्धजन्य वातावरण असते. भारत विरोधी भिंती रंगल्या असत्या. लष्करावर सशस्त्र हल्ले झाले असते. पण आज संवादाने प्रश्न सुटला.

रक्षति स्म परस्परं. हा भाव जागवून समाजाने समाजात काम केल्यावर हे झाले. ७५ वर्ष साजरं करताना हे समजावून घेणे आवश्यक आहे.


असेच एकात्मतेच्या वीणीसाठी अजून एक क्षेत्र घेऊ. पुढील लेखांमधून.

सुनील देशपांडे
Article (64/n)
Photo courtesy Google

Comments

  1. Fortunately these states have become a tourist attraction. But the textile of the states and cuisine of the states hasn't yet reached in the rest of the states.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन