विघटन वादी राजनिती व काश्मीर प्रश्न
लेखांक ६४*
पुर्वांचलासारखे सर्व घटक अस्तित्वात असल्यामुळे भारताच्या उत्तर सीमेवरही एकात्मतेची वीण क्षीण करणारे जालीम घातक रसायन दीर्घकाळापासून उकळत होते.
इस्लाम मानणारी बहुसंख्यांक लोकसंख्या, भारतात केंद्रस्थानी बौध्दिक दृष्टीने कणाहीन सरकार व सक्रिय आंतरराष्ट्रीय दबावगट हे सर्व काश्मीर या ठिकाणी सुध्दा उपस्थित होते. पूर्वांचल पेक्षा इस्लामचा स्वभाव म्हणून क्रौर्य हा अजून एक जालीम कंगोरा या घातक रसायनाला होता.
ऐतिहासिक चूका हा विषय बाजूला ठेवून सुध्दा तीन क्षेत्रात विभागलेल्या जम्मू काश्मीर व लडाख यातील फक्त काश्मीरच फुटीरतेच्या उंबरठ्यावर का? हा प्रश्न, सरकार, स्वयंघोषित विचारवंत व त्यामुळे जनतेला पडला नाही व त्यामुळे परत हा विषय सोडवण्याची जबाबदारी समंजस राष्ट्र हितैषी समाजावरच येऊन पडला.
वरील प्रश्न कळूच द्यायचा नाही हा खास खिलाफती शहामृगी पवित्रा सर्वच क्षेत्रांनी घेतल्यामुळे नीरक्षीरविवेक हा राहिलाच नव्हता.
अशाही वातावरणातून आजची काश्मीर समस्या सुटण्याची कामगिरी गेली ७५ वर्षे एकेकट्या व्यक्ती, संघटना व समाज कसा करत होता हे या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे या कालखंडातील इतिहास समजून घेताना विचारात घेणे आवश्यक ठरणार आहे.
राष्ट्र भावनेने प्रदिप्त समाज हा नरसिंह अवतार धारण करतो फक्त त्या समाजाला त्याची ओळख सांगावी लागते.
हे काश्मीर समस्येबाबत कसे घडले ते पुढील लेखांपासून पाहू यात.
सुनील देशपांडे.
Article ( 65/n)
Comments
Post a Comment