राष्ट्रीय एकात्मतेची समस्या - काश्मीर

लेखांक ६५*

मुघल आक्रमणाच्या काळात अन्यायाने हिंदू धर्म सोडायला लागलेल्या बांधवांना परत येण्याचे रस्ते बंद झाल्यामुळे काश्मीर समस्या तीव्र बनत गेली. मुस्लिम दबावगट ही आपली शक्ती आहे व सरकार दबावाखाली येते हे जाणवल्यावर माकडाच्या हातात कोलीत अशीच अवस्था झाली व फाळणीच्या पार्श्वभूमीवर चुचकारण्याच्या नादात प्रश्न चिघळून सडू लागला होता. शेजारी पाकिस्तान निर्माण झालेच होते व निर्नायकी नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात नकारात्मक बचावाच्या  पवित्र्यात आपण आलो होतो.

पण या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू समाज जागृतीची जी प्रक्रिया चालू होती त्याचे दृश्य परिणाम जाणवू लागले होते.काश्मीर खो-यातील हिंदू, ज्यांना परिचित भाषेत काश्मिरी पंडित म्हणतात ते भारताप्रती अनन्यसाधारण निष्ठा ठेवून होते. जम्मू व लडाख हेही भारत निष्ठा या बाबत निःशंक होते. त्यामुळे देशभक्तीचा सूर टीपेवर होता व त्यातच महाराज हरीसिंग हिंदू होते.

पण समस्या हिंदू व देशासाठी दिल्ली नेतृत्व ही होती. संघर्ष आपल्यांशीच होता ही समस्या होती.

याही ठिकाणी पुर्वांचलाप्रमाणेच समस्या उद्भवली. जगभरात काश्मीरचा आवाज म्हणजे फुटीरतावादी शक्तींचा आवाज असे समीकरण झाले होते. शेख अब्दुल्ला हे एकमेव काश्मीरचे नेतृत्व अशी सरकारने स्वतः ची व मिडीया तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाची समजूत करून दिली. परीणाम म्हणून सामान्य काश्मिरी व्यक्तीला अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ राहीले नाही.

हा फक्त नकाशा पाहून कळते कि तत्कालीन नेतृत्वाकडे विजिगिषुता तर नव्हतीच पण पराभूत मानसिकतेचे धनी मात्र होते.

काश्मीर खोरे म्हणजेच काश्मीर असे चित्र सरकारनेच केल्याने जम्मू लडाखला काय वाटते याला किंमत राहिली नाही व काश्मीर खोऱ्यात नेता म्हणून एकच नाव अशी रचना लागली. त्यामुळे देश म्हणून काश्मीर जम्मू लडाखला काय वाटते हे कधी चर्चेतही आले नाही.

ही समस्या सुटली कशी? कोणकोणते प्रयत्न, व्यक्ति, संघटित समाज, देशात जागा झालेला एकात्म भाव व दीर्घ काळ चाललेले सकारात्मक प्रयत्न हे आपण समजून घेऊ या पुढील लेखांमधून.

सुनील देशपांडे.
Article (66/n)
Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन