अयोध्या आंदोलन व राष्ट्र जागरण

लेखांक ७९*


या आंदोलनाचे स्वातंत्र्योत्तर भारतात काय महत्व आहे ह्या अंगाने आपण विचार करू या.


पहिल्या पायरीवर कार्यकर्ता प्रशिक्षण व ध्येयाप्रति आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्या प्रयत्नांसाठी अनेक छोटे-मोठे उपक्रम चालू होते.


त्यात पुढे एक अखिल भारतीय कार्यक्रम आला तो राम ज्योत यात्रा. साधा सोपा कार्यक्रम. अयोध्येत एक यज्ञ करून एक ज्योत घेऊन देशभर प्रवास करायचा व जनतेला अयोध्या प्रश्न समजावून सांगायचा.


'ज्योतसे ज्योतसे जलाते चलो' असा कार्यक्रम. प्रत्येक जिल्ह्यात ती राम ज्योत आली. त्या आधारे देशातील प्रत्येक जिल्ह्यातून यात्रा निघाली. कशा प्रकारे स्वागत होईल अशी चिंता हिंदू समाज संघटित करणा-या कार्यकर्त्यांना होती. पण प्रत्येक कार्यक्रमात एक गोष्ट निश्चित होती, ती म्हणजे कार्यकर्ता प्रशिक्षण. येथेही ते झालेच. कार्यकर्ता प्रशिक्षण म्हणजे ध्येया विषयी आत्मविश्वास निर्माण करणे.

एखाद्या छोट्या गावातील छोटा प्रसंग पण हे देशातील प्रत्येक खेड्यात घडले.


पण जशी गावा गावात ज्योत जाण्यास सुरुवात झाली तशी तशी योजना बिघडू लागली. मुक्कामा पर्यंत या पाच गावात थांबू असे ठरविणा-या कार्यकर्त्यांना रामनामाची ताकद कळली.


गाव काय, गावाकडे जाणारा फाटा आला तरी रस्ता बंद. पाणी मारलेल, सडा संमार्जन, व शेकडो महिला पुरुष रांगा लावून ज्योतीचे दर्शन घेत आहेत ही अवस्था. आमच्या गावात चला हा आग्रह. न सांगताच न ठरवताच उत्स्फूर्तपणे प्रसाद वाटप.


अयोध्देहून राम ज्योत? हे कारण पुरेसे आहे. जणू शबरी पुत्रच देश झाला होता. आयुष्यात अयोध्या पाहिली नव्हती व कधी पहाणार ही नव्हते, पण  ते सर्व हिंदू नागरिक एकत्र जमत होते. गावात एकही माणूस रहात नव्हता, सर्व गाव रस्त्यावर, रामज्योतीच्या दर्शनासाठी.


या गावाहून गडी माणसं पुढच्या गावाला रामाला सोडायला येत होते. एक रथ निघालेला, संध्याकाळी त्या रथाची  मिरवणूक बनायची. काही न सांगता प्रसादाच्या पंगती उठत होत्या.


मागच्या गावची दर्शन राहिलेली मंडळी, मुक्कामी गावात यायची. कार्यकर्ते हवालदिल होत पण मुक्कामी गावाला काही ताण नाही.


बाहेर गावची मंडळी आधी प्रसाद घ्या मग दर्शन.गाव स्वागत करत होते. येतील तेवढी मंडळी जेवत होती. रात्रभर गावकरी सेवा देत होते. ही एका जिल्ह्याची कथा जरा विस्ताराने. कारण देशातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक गावात हाच अनुभव, फक्त भाषा भिन्न.


राम हे राष्ट्र जोडणारे सूत्र आहे, एकात्मतेची वीण घट्ट करणारे नाव आहे. याची कार्यकर्त्यांना व समाजाला नीट ओळख झाली. हे प्रशिक्षण होते. समाजाच्या उत्स्फूर्त हिंदू भावनेवर टाकलेली कृत्रिम राख पार उडून गेली व हिंदूत्व विचार व समाजातील भाव लख्ख उजळून निघाले.


असाच परीचय पुढील टप्प्याचा, पुढील लेखात.


सुनील देशपांडे.
Article (80/n)
Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन