अयोध्या आंदोलन.प्रशिक्षणाची प्रयोगशाळा
लेखांक ८०*
स्वातंत्र्योत्तर भारताच्या सर्व व्यवस्थांमध्ये अमुलाग्र बदल करणा-या अयोध्या आंदोलनातील प्रत्येक उपक्रमाने हे काम केले आहे. हे कशा पद्धतीने घडले आहे हे समजण्यासाठी हे उपक्रम आपण पहात आहोत.
यातील प्रत्येक उपक्रमाने जागतिक विक्रम तर केले आहेतच पण राष्ट्र संक्लपना व्यवस्थित समजावून दिली आहे हे या धार्मिक आंदोलनाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
राम ज्योती नंतरचा आंदोलन टप्पा होता श्रीराम शीला पूजन. साधाच कार्यक्रम. गावक-यांनी वीट घ्यायची, त्यावर श्रीराम लिहायचं, ग्रामस्थांनी मिळून पूजा करून वीट अयोध्येत पाठवून द्यायची. छोटा कार्यक्रम पण अवर्णनीय परीणाम.
गावातून वीट, पण यातून घडले असे की प्रत्येक गावातून वीट. पाच लाख खेड्यातून वीटा आल्या. यातील प्रत्येक गाव हे महत्वाचे. प्रत्येक गाव ही राम शक्ती. कार्यकर्त्यांना समजलं राम देश जोडतो म्हणजे काय? समाजाला समजले अयोध्येत राममंदिर हे एका संस्थेचे नाही तर हे माझे ध्येय आहे. व परिणाम स्वरूप संपूर्ण समाज शक्तीरूपात राम मंदिर निर्मिती मागे उभा राहिला.
पहिल्या पायरीत, राम ज्योत यात्रेत, रामभक्तीची अनुभूती आली तर शीला पूजनात मी मंदीरासाठी काम करणार हे भाव जागरण कोटी कोटीच्या हिंदू समाजात झाले. संपूर्ण समाज एकमुखाने म्हणला हे मंदीर मी स्वतः बांधणार. शीला पूजन कार्यक्रम हा ह्या साठी होता. प्रत्येक देशवासी कार्यप्रवण करण्यासाठी होता.
यातील प्रत्यक्ष आंदोलन हा टप्पा अभ्यासू पुढील काही लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article ( 81/n).
Comments
Post a Comment