रामजन्मभूमी आंदोलन शीला न्यास.
लेखांक ८१*
जागरण पूर्ण झाल्यावर आला स्वाभाविकच आंदोलनाचा टप्पा.आधीच्या धसक्याने वा अफाट जनसंख्येच्या इच्छेमुळे अयोध्येत शीला पूजन शांतीपूर्ण पध्दतीने झाले. समाजाच्या धाकाने सरकार नरमले पण समाज परीवर्तन हे मात्र समाजाच्या मानसिक परीवर्तनावर अवलंबून असते. ज्या समाजात बदल घडवायचे त्या समाजाला आंदोलक विश्वासार्ह वाटावे लागता. त्याचा सुखद अनुभव हा यावेळी आला.
सर्वार्थाने धार्मिक कार्यक्रम, हिंदू समाजातील सर्व धर्माचार्यांच्या उपस्थितीत होत असताना, एका सामाजिक कुरीतीवर जोरकस प्रहार झाला. शीलान्यासाची पहिली वीट ही बिहार मधील दलित बांधव चौपाल यांच्या हस्ते रचली गेली. धर्मसंमत कार्यक्रमात हे मूलभूत परिवर्तन पहायला मिळाले.
कामेश्वर चौपाल या बिहारी दलित बांधवाने शीलान्यासातील पहिली वीट साधुसंतांच्या उपस्थितीत ठेवली. अयोध्या आंदोलनाचा सामाजिक आशय.
शक्तीने सरकार वाकवता येते हे पाहिले पण महत्त्वाचे होते शीलान्यासातील सामाजिक परिवर्तनाचे उचललेले पाऊल. ते पाऊल कुणा बंडखोराने नाही तर ज्यांच्या नावावर हे सामाजिक दोष धर्म म्हणून खपवले जात, त्यांच्याच, साधुसंतांच्या उपस्थितीत व आशीर्वादाने.
हे आंदोलन सामाजिक मुक क्रांतीसाठी फारचं स्मरणात ठेवावे लागेल. आपण पहात होतो कि समाज सुधारक धुरीणींचे प्रयत्न हे स्वातंत्र्य विरोधात शस्त्र म्हणून इंग्रज वापरत होते पण डॉ हेडगेवार यांनी समाजाचे गुण व महानपण यांच्या मदतीने आधी स्वाभिमानी व संघटित समाज उभा केला व या समाजाने नंतर स्वयं स्वीकृत स्वतः मधील बदलास प्रारंभ केला.
हे शीलान्यासाने जगाला दाखवून दिले. म्हणून हा फार महत्वाचा टप्पा ठरला.
प्रत्यक्ष आंदोलन पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (82/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment