वैचारिक महा संघर्ष अयोध्या आंदोलन .
लेखांक ८२*
शीलान्यासापर्यंत साधारण सरळ झालेला प्रवास अता मात्र संवेदनशील बनू लागला होता. एका वैचारिक गुलामगिरीची साखळी तोडून भारताचा मूळ वैचारिक गाभा जगासमोर मांडण्यासाठी व्यक्ती नाही तर संपूर्ण समाज उभा ठाकला त्यामुळे संघर्ष जरी वरकरणी शारिरीक होता तरी वर म्हटल्याप्रमाणे वैचारिक गुलामगिरीची बेडी नव्हे साखळदंड तोडण्याचा हा संघर्ष होता.
साधारणपणे कोणतेही आंदोलन हे जेंव्हा तात्कालिक विषयासाठी होते तेंव्हा ते काही मलमपट्टी करून सुटते वा थांबवले जाते. पण ते ज्यावेळी मूलभूत सैद्धांतिक विषयासाठी असतं त्यावेळी मात्र ते इस पार या उस पार अशा स्वरूपाचे असते. त्यात दहिखाऊ महीखाऊ ही भूमिका चालत नाही. त्यामुळे या सर्वंकष आंदोलनाचाचे घोषवाक्य होते. Now or Never. सकारात्मक मराठीत म्हणता येईल हो, आज व अत्ताच.
या आंदोलनातून प्रचंड वैचारिक नवनीत बाहेर पडणार होते. सिंहासने हादरणार होती. वैचारिक इमले उभारून समाजाचे बौध्दिक शोषण करणाऱ्या संस्था, साम्राज्ये उन्मळून पडणार होती.
अयोध्येत या सर्वंकष युध्दाचा पांचजन्य वाजू लागला होता. सर्वार्थाने महाभारत युद्ध सुरू होणार होते.
जशी तत्वे महाभारत युध्दाची कारणे होती तसेच आज अयोध्येत घडत होते.
तपशीलवार पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (83/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment