वैचारिक द्वंद्वासाठी सिध्द हिंदू समाज

लेखांक ८३*


अशा सर्वंकष युद्धाविषयी उत्सुकता ही स्वाभाविकच आहे. ६ डिसेंबर ला कारसेवा  सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यात कायदेशीर लढाया सुध्दा चालू होत्या.


पण कोणाही विरोधकाला मंदीर नको हा मुद्दा मांडण्याची  हिंमत नव्हतीच. विरोधकांचा मुद्दा एकच होता. बाबरी ढाचा पडता कामा नये.
हाच बाबरी ढाचा जो राम मंदिर तोडून बांधला गेला होता. धर्म निरपेक्षतेच्या आडून राष्ट्र भाव स्खनन करण्याचा अव्याहत प्रयत्न हिंदू समाजाने वैचारिक व व्यवहारीक पातळीवर मूळापासून उखडून टाकला.


वैचारिक संघर्षातील सर्वात महत्वाची बाजू हीच होती. बाबरी ढाचा म्हणजे चर्चेसाठी बाबरी मशीद पडली तर भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा तो पराभव ठरेल. हा प्रमुख युक्तिवाद होता. ही धर्म निरपेक्षता संक्लपना जपण्यासाठी आम्ही मातृभूमीची फाळणी सुध्दा स्वीकारली. त्या मूल्यावर आघात होईल. ही वैचारिक द्विधा मनस्थिती या संघर्षाच्या मुळाशी होती.


त्यामुळे वैचारिक संघर्षासाठी दोन तट निर्माण झाले. साधारणपणे सर्व समाज  एकीकडे व बौध्दिक नेतृत्व आम्ही करतो हा गंड असलेले डावीकडे झुकलेले विचारवंत, या पराभूत विचाराचा सर्वंकष पराभव समोर दिसत असतानासुद्धा स्वतः ची वैचारिक मक्तेदारी चालू रहावी म्हणून चालू केलेला आक्रोश ही त्यांची ताकद होती. सर्व प्रचार माध्यमे ही वर्षानुवर्षे याच विचारवंत व सरकारची बटीक असल्याने ती ही या संघर्षात या जनभावने विरूद्ध उभी होती. त्यामुळे खरच हा संघर्ष इतका खोलवरच्या मुद्दा्यावर आहे का? हे न कळलेले काही त्रयस्थ विचारवंत, जात हा राजकीय आधार असणारे पक्ष व नेते, सामान्यपणे हे आपल्यावर आक्रमण आहे असा समज झालेला मुस्लिम व काही प्रमाणात ख्रिश्चन समाज हेही विरोधात उभे झाले. व असा एक वर्ग जो देशाबाहेर असूनही वैचारिक दृष्ट्या राष्ट्र ही संकल्पना नको मानणारा व म्हणून पंचमस्तंभी कारवाया करणारा जागतिक बौध्दिक क्लब व याच विचारवंताच्या बौद्धिक  उष्टावळी खाणार सरकार हे दुसरीकडे असे दोन भाग पडले.


शीला पूजन या कार्यक्रमापासून हा संघर्ष सुरू झाला होता. अनेकविध बौद्धिक व्यासपीठ ही लढाई लढू लागली होती.


या जन सामान्यांकडे काय युक्तिवाद असणार अशा भ्रमात असणा-यांना हळूहळू या संघर्षात उतरलेला हिंदू समाज काय तयारीने उतरला आहे ह्याची जाणीव होऊ लागली.


कसा झाला हा संघर्ष हे पुढील लेखांमधून.


सुनील देशपांडे.
Article (84/n)
Photo courtesy Google 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन