हिंदू ओळख ही भारत ओळख
लेखांक ८४*
आपण पाहिले कि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जे एक वैचारिक वायुमंडळ निर्माण केले गेले होते कि ज्याचे दुष्परिणाम फक्त स्वातंत्र्य चळवळच नाही तर देश भोगतो आहे, ते वायमंडल मोडून काढणारे हे आंदोलन होते.
हा एकसंघ देश नाही तर इंग्रजांनी हा देश बनवला. राष्ट्र ही एक जैविक कल्पना नाही. त्या भूमीवर राहयला येणा-या सर्वांचे कडबोळे म्हणजे देश. देश ही साधी भौतिक व्यवस्था असून संस्कृती व. थोतांड आहे. भारतीय स्वातंत्र्य ही मुस्लिम सहभागाशिवाय अशक्य. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे मुस्लिम अनुनय. व सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे हिंदू राष्ट्र नाही.
या आंदोलनाने वरील सर्व गृहितक साफ नाकारली व हिंदू समाजाने स्वतःची ओळख सांगून ही भारत ओळख आहे हे पटवून दिले.
प्रथमतः बाबर परकिय ही बाब नोंदविली व समाजाने स्वतः ला पटवून दिले कि आपले व परके यात फरक असतो व बाबर हा परका लुटेरा आहे. त्याच्या मीर बांकी या सरदाराने हिंदूना अपमानित करण्यासाठी रामललाचे मंदीर पाडले.
आक्रांत बाबर हा परका आहे व तो भारतावरील आक्रमक आहे हे हिंदू समाजाने सुस्पष्ट केले ते अयोध्या आंदोलनात. म्हणून हे आंदोलन ऐतिहासिक आहे.
हिंदूना शांतीसाठी, सौहार्द रहावे यासाठी अपमान विसरावा हा सल्ला १००/१५० वर्षे दिला जात होता. तो आज हिंदूंनी नाकारला. अपमान स्वीकारणे नाकारले. इंग्रजीत एक म्हण आहे, If you are ready to accept bread at the cost of liberty, you first loose bread & then liberty for asking for bread.
रक्तही सांडायचे व अपमान ही स्विकारायचा हे होणार नाही. हा आमूलाग्र वैचारिक बदल या आंदोलनाने केला.
असेच अजून काही पुढील लेखात.
सुनील देशपांडे
Article (85/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment