भारताचा आधारवड हिंदू समाज

लेखांक ८५*

हिंदू समाजाने इतिहास हा त्यातून शिकण्यासाठी असतो हे सत्य स्वीकारलं व ५०० वर्षांचा इतिहास नीट अभ्यासला. या देशात रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी एकही दिवस असा उजाडला नाही कि ज्या दिवशी कोणी ना कोणी तरी प्रयत्न केला नाही, पण असेही इतिहासाला माहिती नाही कि संपूर्ण देशाने एका वेळी प्रयत्न केला. म्हणून यावेळी संपूर्ण समाजाने एकावेळी प्रयत्न सुरू केला.

या भूमीवरील हिंदू समाज हा राष्ट्रीय समाज आहे, त्यामुळे त्याचे मान अपमान, सुख दुःख, सणवार हेच या देशाचे भावनांचे प्रतिक  असणार आहेत. पालेस्टाईन या मुस्लिम प्रश्नावर आम्ही भारत हिता ची होळी खेळून, इस्त्र्यायलशी मैत्री नाही नाकारणार. भारताचे हित हे ८०% हिंदू असलेल्या समाजाशी बांधलेलं आहे त्यामुळे त्याचा अपमान हा देशाचा अपमान हे गृहितक नवीन मांडले व घडवून दाखविले. ८०% जनतेच्या अपमानाचे प्रतिक हे धर्मनिरपेक्ष तत्व स्वीकारण्याच्या नावाखाली जीवंत ठेवता ‌येणार नाही म्हणून मशीद पाडली जाणार. व देश, समाज व जग समजून चुकले कि समाजाचा राष्ट्रीय भाव जागा झाला कि तो नीरक्षीर करतोच.

राष्ट्र उभे राहते ते तेथील संस्कृती मुळे. भारताची संस्कृती ही गंगा जमना तहजीब आहे हे या देशाने नाकारले व युग युगसे बहता आया यह पुण्य प्रवाह हमारा  हे सत्य स्वीकारलं.

हा देश आक्रमकांनी नाही तर संस्कृतीने बनवला आहे हे स्वीकारले. ५२ शक्तीपीठांनी, चार धाम यात्रांनी, काशी रामेश्वर यात्रा यांनी ही संस्कृती घडवली आहे व हे सत्य या लढ्यात हिंदू समाजाने जगाला कळवून दिले.
अयोध्या ते रामेश्वरम् श्रीरामाचा प्रवास. उत्तर दक्षिण भारत एकात्म कसा केला प्रभू श्रीराम यांनी. तिच कथा श्रीकृष्णांची पूर्व पश्चिम भारत जोडणारी,५२ शक्ती पिठांची, चार धाम यात्रांची. भारताची एकात्मता ही अशी सांस्कृतिक आहे. म्हणून चिरंजीव सुध्दा.


हे ऐतिहासिक सत्य स्वीकारणार कि नाकारणार हा प्रश्न विचारून शत्रू मित्र रेषा स्पष्ट केली.

फार पूर्वीपासून हा एकात्म भाव जागवणारी संस्कृती व उपक्रम म्हणजे प्रयत्न पूर्वक एक जन एक देश हे सत्य प्रस्थापित केले. आज अयोध्या आंदोलनातील सर्व उपक्रम हे त्याच हजारो वर्षांच्या रचनेमधून तयार झाले. शीलापूजन, राम ज्योत, शीला न्यास, राम रथ यात्रा इ.

त्यामुळे जी वैचारिक गृहितक उभारून हे १९४७ साली राष्ट्र उभे राहिले हे पटवण्याचा वैचारिक प्रयत्न चालू होता ते गृहितक या आंदोलनाने मोडून काढले व म्हणून ही वैचारिक लढाई होती.

पण ही लढाई ही त्याहूनही खोल होती, कशी ते पुढील लेखांपासून पाहू.

सुनील देशपांडे.
Article (86/n)
Photo courtesy Google 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन