अपमानाचा प्रतिशोध
लेखांक ८६*
वैचारिक आघाडीवर सर्वंकष पराभव झाल्यानंतर जी भीषण विकृत मानसिकता या वैचारिक मुखंडानी दाखविली, त्यामुळे संपूर्ण देशाला हे समजले की राष्ट्र संक्लपना न मानणा-या या विकृत विचारसरणीमुळे या देशाने नक्की काय गमावले आहे.
पण त्या व्यतिरिक्त सुध्दा अनेक रत्ने ह्या अयोध्या मंथनातून बाहेर पडली. हिंदू हा लज्जास्पद नव्हे तर स्वाभिमानाने मिरवण्याचा शब्द व भाव आहे हे त्यामुळे जागृत हिंदू समाजाच्या लक्षांत आले व ह्या देशाला पुनरपि वैभवशाली बनविणे हे माझे काम आहे हा भाव या जागृत समाजमनात जागा झाला.
या आंदोलनाने हे जगाच्या लक्षांत आणून दिले कि कोणताही स्वार्थ नसताना माणूस मृत्यूला सामोरा जाऊ शकतो व एक दोन नाही तर शेकडोंच्या संख्येने. सशस्त्र नाही तर निशस्त्र. आजच्या एखाद्या तात्कालिक प्रसंगातील प्रतिक्रिया म्हणून नाही तर ५०० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेसाठी.
सर्व जगाला इस्त्र्यायलच्या इतिहासात रमावे लागे, प्रतिशोधाच्या तेजस्वी प्रवासासाठी. राम मंदिर आंदोलनाने त्या तेजःपुंज पंक्तीत हिंदू पराक्रमाला नेऊन बसविले.
हा जसा पराक्रम होता तसेच जगाने हे पाहिले कि समाजाने ठरविले तर समाज काय करतो? रक्षति स्म परस्परं. याचा दाहक अनुभव सर्वांनीच या आंदोलनाच्या निमित्ताने घेतला.
तरूण, वृध्द, महिला, विद्यार्थी कोणीही मागे नव्हते. अनोळखी रस्त्यावर , मैलोनमैल चालताना एकाही गावात चकवा नाही, पोलिस नावाची भिती नाही, जे घर दिसेल येथे जय श्रीराम हा परवलीचा शब्द काम करायचा. समाजाने समाजासाठी चालवलेले हे आंदोलन समाजच लढत होता व समाजच एकमेकांचे रक्षण करत होता.
म्हणून या आंदोलनाने समाजाचेच प्रशिक्षण केले. असेच अजून काही. पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे.
Article (87/n)
Comments
Post a Comment