हिंदू विजयाची प्रासाद चिन्हे रामजन्मभूमी आंदोलन.

लेखांक ७७*

संपूर्ण जगामध्ये सर्वार्थाने वेगळे पण मार्गदर्शक असे आंदोलन म्हणजेच रामजन्मभूमी आंदोलन होय.सामान्य लोकांनी, कोणतीही वैयक्तिक मागणी नसताना संपूर्ण शांततेने व भक्तीमार्गाने केलेले संपूर्ण यशस्वी व अत्यंत दीर्घकाळ चालवलेले हे आंदोलन होते. या आंदोलनात फार प्रसिद्ध पुढारी, समाज धुरीण, आंदोलक नसतानाही, तसेच हा कोणत्याही प्रकारे Burning issue नसताना जन सामान्यांनी स्वतः च्या आराध्यासाठी आरपारची लढाई लढली, वर्षानुवर्षे लढली व मुख्य म्हणजे यशस्वी होईपर्यंत लढली.
या आंदोलनातील अनेक टप्यांपैकी एक शीला पूजन. एक गाव एक वीट.


वास्तविक या विषयावर अन्यत्र ही संदर्भ आले आहेत, येतं रहाणार आहेत, तरीही या आंदोलनाचा स्वतंत्रपणे विचार करावा लागतो आहे. कारण या आंदोलनाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत येथील आधीची एक ecosystem पूर्ण मोडीत काढून, हिंदू समाजाने स्वतःची व्यवस्था निर्माण केली. तसेच त्या व्यवस्थेवर सर्वांना येण्यास भाग पाडले. व संपूर्ण नवे मापदंड भारतीय जनजीवनात उत्पन्न केले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षातील सर्वात प्रभावशाली घटना कोणती? तर रामजन्मभूमी आंदोलन.


जसे ह्या देशातील स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षातील सर्वात प्रभावशाली जन संघटन कोणते, ज्यांनी या काळावर सर्वाधिक प्रभाव टाकला तर उत्तर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या नव्वदच्या दशकापासून या दोन प्रभावी गोष्टींनी देशाचे संपूर्ण चित्र पालटून दाखविले. म्हणून या आंदोलनाचा सर्वांगानी विचार करणे क्रमप्राप्त आहे.


म्हणून आंदोलन, हिंदू भावविश्व, समाज म्हणून हिंदू वर्तन, फुटीरतेचे ग्रहण न लागलेले आंदोलन, जगभराने आश्चर्याने पाहिलेले आंदोलन, राजकिय परीभाषा बदलवलेले आंदोलन, राष्ट्रीय एकात्मता परीपुष्ट केलेले आंदोलन, सर्व व्यवस्था विरोधात असताना झालेले आंदोलन, भारताच्या भाग्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्य ही पूर्व अट काढून टाकलेल आंदोलन व जन नेता निर्माण करण्याची क्षमता असलेले आंदोलन असे अनेक पैलू क्रमशः पुढील लेखात पाहू यात.


सुनील देशपांडे
Article (78/n)
Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन