रामजन्मभूमी आंदोलन पुढे चालू.
लेखांक ७८*
संपूर्ण देशाच्या विचार विश्वावर सणसणीत आघात करून त्यात अमुलाग्र बदल घडवणारे हे रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन, इतिहास म्हणून जरी पाचशे वर्षांपूर्वी पासून चालू असले तरी नजिकच्या भविष्यात त्याची सुरुवात सुमारे १९८३/८४ साली सुरू झाली, एका छोट्याशा कार्यक्रमाने.
अयोध्देत बळेच पाडले गेलेलं श्री राम जन्मस्थळावरील मंदीर पुन्हा उभारले जावे. असा ठराव जास्तीत जास्त ग्राम पंचायतीनी करावा असा छोटासा कार्यक्रम. पण देशातील बहुतांश ग्राम पंचायती पर्यंत कार्यकर्ते पोहोचले. पण आंदोलन कोणत्या हेतूने होत आहे हे नीट समजून सांगणारा कार्यक्रम. निरपवादपणे सर्वांनी ठराव पारीत करून या मागणीला पाठिंबा दिला.
या ठरावाचा हेतू साध्य झाला. कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण मिळाले कि भगवान श्रीराम हे संपूर्ण देश जोडणारे महापुरूष आहेत. हे ही समजले कि रामभक्ती राष्ट्र भक्ती ही सर्व भारतीयांमध्ये समान आहे. हिंदूत्वभाव हा पक्ष निरपेक्ष पणे सर्वांमध्ये आहे. संपूर्ण देशातील एकात्म भावाची ओळख कार्यकर्त्यांना नीट झाली.
अन्यथा तेंव्हा भाजपाच्या ग्रामपंचायती नव्हत्या पण ठराव सर्वांचे होते.
असे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले. ध्येय व उद्दिष्टे स्पष्ट झाली व पुढील वाटचालीसाठी पाया भक्कम बनला.
यावर इमारत कशी उभारली गेली ते पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे.
Article (79/n).
Comments
Post a Comment