आणी हिंदू शब्द राजकारणाच्या केंद्रस्थानी
लेखांक ८७*
या संपूर्ण विचारधारेचा व त्या साठीची कार्यपध्दती व कार्यकर्ता निर्माण या सर्वांचा संपूर्ण शतकावर काय प्रभाव पडला हे या एका अयोध्या आंदोलनाने संपूर्ण जगाच्या लक्षांत आणून दिले. त्यामुळे या महत्वपूर्ण आंदोलनाचा तपशीलवार विचार करावा लागत आहे.
यातील सर्वात महत्वाचा परिणाम राजकीय आहे. यात कोणते महत्वाचे बदल घडले हे पहाणे खूप औत्सुक्याचे ठरत आहे. स्वतंत्र भारतात १९५२ पासून प्रौढ मतदार मतदान करून स्वतःच्या आवडीचे सरकार बनवित होता. तत्पूर्वी ही मर्यादित अर्थाने मतदान होत होते व मतदारांची इच्छा डावलून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुध्दा. फाळणी हे त्याचं एक उत्तम उदाहरण. अर्थात विषय १९५२ पासून चा आहे.
निवडणूक राजकीय असली तरी त्याला संदर्भ हे सामाजिक असतात. त्यामुळे १९५२ ते १९८९ पर्यंत निवडणुकांची गणित ही हिंदू समाजातील जाती, मुसलमान व ख्रिश्चन अशी घातली जाऊ लागली होती. ह्याच कारण हे एका वैचारिक पंगूपणात होते. हिंदू असे काही नाही हा युक्तिवाद, तर्कट भारतातील बौध्दिक जगतावर राज्य करत होते. हिंदू म्हणजे त्यातील जात हे स्पष्टीकरण दिले जात होते. पण हिंदु वैचारिक धुरीणींनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेली हिंदू शब्दाची मांडणी व १९२५ साली सुरू झालेली हिंदू समाज संघटनेची व्यवहारीक मांडणीचा समन्वय अयोध्या आंदोलनात झाला. एके काळचा हिंदू हा option चा असलेला प्रश्न कळीचा मुद्दा बनला. कसे ते पुढील लेखांपासून पाहू.
सुनील देशपांडे
Article (88/n)
Comments
Post a Comment