लोकशाही हा भारतीय स्वभाव

लेखांक ९१

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे होणार आहेत. त्यामुळे सिंहावलोकनासाठी हा कालावधी पुरेसा आहे. खंडप्राय देश व प्रचंड लोकसंख्या, अत्यंत टोकाची विविधता हे सर्व असूनही लोकशाहीच्या दीर्घसूत्री मार्गावरून भारताचा विकासाचा प्रवास ब-यापैकी निर्विघ्नपणे चालू आहे.

ह्याच्या श्रेयाची थोडी चर्चा अत्यावश्यक आहे. आधुनिक शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण, सामान्यपणे राजेशाही पध्दतीमुळे स्वतः आग्रहपूर्वक पुढाकार घेण्याचा नसलेला स्वभाव, पराभूततेचे पाठीवरील ओझे या सर्वातून लोकशाहीचा प्रवास कसा झाला याचे विवेचन आवश्यक आहे. सामान्यपणे वरील अडचणींना तोंड देणारा समाज फार काळ जबाबदारीची व्यवस्था पेलू शकत नाही. मग भारताला हे कसे जमले?

सामान्यपणे याच्या यशाची सत्य मिमांसा इतरत्र फारशी होणार नाही, ती आपण या ठिकाणी करणार आहोत.

यातील भारताची बलस्थाने आपण पाहूच पण तत्पूर्वी ब्रिटीशांच्या ताब्यातून सामान्यपणे एकाच वेळी मुक्त झालेल्या इतर देशांशी थोडी तुलना करावीच लागेल. म्हणजे, आमची बलस्थाने अधिक सुशोभित होऊन दिसतील. ब्रिटिश साम्राज्याचा भाग नसलेला चीन,व  ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेले सध्याचे पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका व. देश यांचा विचार करता येईल.

ही ढोबळ तुलना व भारतीय बलस्थानांचा विचार करू पुढील लेखांमधून.

सुनील देशपांडे.
Article (92/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन