आशियाई देश व भारतीय लोकशाही एक तुलना
लेखांक ९२*
चीन व भारत हे जवळपास एकाच वेळी स्वतंत्र झाले. भारतासह जगाने विस्मयाने तोंडात बोटे घालावीत, एवढा विकास चीनने केला व जगातील सर्वात शक्तिशाली, व ताकदवर देश अशी त्याची ओळखही निर्माण झाली. पण माओ यांनी क्रांतीचा व पुढे त्यांनीच यात भर घालून सतत क्रांतीचा मार्ग स्वीकारला व त्यासाठी पूर्व अट म्हणून हुकूमशाही मार्गाचा अवलंब केला. सामान्यपणे विरोधी सूर मोडून काढण्यासाठी, राजकीय विरोधक, स्वतंत्र विचारवंत, संवेदनशील विद्यार्थी हे ह्या हुकुमशाहीचे बळी ठरले. पण शस्त्र, सैनिक, कार्यकर्ते, पोलादी पडदा व माओचा दरारा या सर्वातून हुकूमशाही विरोधा ऐवजी प्रगतीचे गुणगान हे अगतिक प्रसार माध्यमांनी उचलून धरणे क्रमप्राप्त होते. तसेच घडले. ज्यांना विचार करायचा आहे त्यांना मरणे वा पळून जाणे एवढे दोनच पर्याय उपलब्ध होते. व या भूमिकेचा फटका भारतानेही १९६२ साली खाल्ला.
हा आहे अशिया खंडाचा नकाशा. ब्रिटिशांचे राज्य होते पण स्वस्थ लोकशाही सहजपणे स्विकारून आंगिकारली असे देश किती? या उत्तरात भारताचे महान पण लपले आहे.
पण इतर देशात पाकिस्तान बांगलादेश यांचा प्रश्नच आला नाही. इस्लाममध्ये लोकशाही शब्दच नसल्याने तेथे ती रूजण शक्यच नव्हते व रूजली पण नाही. आपापसात विकृत युध्द खेळून, रक्त सांडून, पण आधुनिक जगात लाज झाकण्यासाठी तोंड देखली लोकशाही आहे. पण जणू त्या लोकशाहीला ना शेंडा ना बुडखा. नेपाळ, मनमार, श्रीलंका मानवी सभ्यतेसह राहिले पण लोकशाही हे तंत्र मात्र प्रभावी पध्दतीने सांभाळू शकले नाहीत. फक्त बौद्ध व हिंदू प्रभावामुळे विकृत अमानवी समाजजीवन तेथे आले नाही व साधारण स्थिर समाजजीवन तेथे अस्तित्वात राहिले.
या पार्श्वभूमीवर भारत व लोकशाही याची चर्चा करावी लागणार आहे. संस्थात्मक लोकशाही अपरिचित असूनही भारताला हे का व कसे जमले हे पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे.
Article (93/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment