भारतीय राजकारणाचे वैशिष्ट्य विसंगती
लेखांक ९४
राजकिय परीवर्तन हे लोकशाहीमध्ये सहज व स्वाभाविक असते. पक्ष बदलतात, सत्ताधारी बदलतात हे होत असते. सामान्यपणे द्विपक्षीय लोकशाही अथवा अन्य फारच कमकुवत पक्ष असे या पक्षीय लोकशाहीचे स्वरूप असते. व
सकृतदर्शनी तरी सत्ताधारी विरूध्द सर्व असे या राजकारणाचे स्वरूप असते. सामान्यपणे मूलभूत राष्ट्रीय संक्लपनांवर एकमत असते.
भारताच्या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षातील राजकीय वातावरण हे जगासाठी अनेक अर्थांनी अनाकलनीय आहे. कारण राष्ट्र, राष्ट्रीयता, समाज अशा मूलभूत विषयांवरील चिंतनातच मूलभूत विरोधाभास असल्याने भारताचे राजकीय विश्लेषण खूपच वेगळे आहे व जगाला आश्चर्यकारक वाटत आहे.
त्यामुळे भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील राष्ट्रीय विचाराचा प्रवास जो आपण अभ्यासत आहोत, त्यात राजकीय प्रवास हा सर्वात महत्वाचा आहे.
प्रथम दुर्लक्षित, नंतर विरोध, नंतर या विचारधारे विरूद्ध विकृत एकजूट, त्या विरोधात प्रखर तेजाने प्रकटलेले राष्ट्रीयत्व, व म्हणून भांबावून जाणे व शेवटी राष्ट्रीय विचारासमोर शरणागती असा येथील राष्ट्रीय राजकारणाचा प्रवास आपण पहाणार आहोत.
कारण राजकारण एकाचवेळी, समाजकारण, इतिहास, राजकारण, अर्थकारण, वैचारिक दृढता, आंतरराष्ट्रीय स्थान या सर्वांवर परीणाम करीत असते.
म्हणून हा विषय पुढील लेखांपासून पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (95/n)
Comments
Post a Comment