भारतीय राजकिय अवकाशात राष्ट्रीय विचारधारा
लेखांक ९६
आपण भारतीय राजकारणाची विचित्र अवस्था पाहिली व ती तशी का झाली याची कारणमिमांसा ही केली. पण संपूर्णपणे नवीन पध्दतीने, देशाच्या मातीत जन्माला आलेले तत्वज्ञान, घेऊन एक राजकीय पक्ष उभा राहिला व लोकांना स्वतः ला अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाले. तत्पूर्वी पर्यायच नव्हता. काॅंग्रेस नको, म्हणजे कम्युनिस्ट तत्वज्ञान नको म्हटल तर विरोधी पक्ष पण तेच साम्यवादाचे वैचारिक दूध पिणारे. म्हणून जनक्षोभाला राष्ट्र म्हणून व्यक्त व्हायला अवकाशच नव्हता.
चीन विरूद्ध एवढी लाजिरवाणी हार झाल्यावर सुध्दा नेहरू सरकारला देशी पर्याय कोणता? हा तसा अनुत्तरित प्रश्नच होता. कम्युनिस्टांचा जसा कम्युनिझम तसा इतर विरोधकांचा समाजवाद. पण देश, संस्कृती रक्षण, या मातीतील तत्वज्ञान, हे दोन्हीकडे नाही. भूमी, सीमा याचे हृदयात स्पंदन नाही. तर बदल करणार कसा? पण शेवटी जनसंघ हा पर्याय मिळाला. जनसंघाची कार्यकर्ता शक्ती व विरोधक एक होऊन कच्छचा करार तर मोडून काढला व देशभक्तीचा विजय घडवून आणला. लोकांना व्यक्त होण्यास जागा मिळाली. जे काही देशासाठी असा पक्ष मिळाला व १९५२ ते ६२ काश्मीर आंदोलन कच्छ करार अशी दोन सरकार विरोधात यशस्वी आंदोलन झाली.
राष्ट्रीय विचार भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ लागला.
परकिय विचाराचा पर्दाफाश सुरू झाला.
हे कसं घडत गेले ते पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (97/n)
Comments
Post a Comment