भारतीय राजकारणातील राष्ट्रीय पर्याय
लेखांक ९८*
स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्र व संस्कृती ही संकल्पना त्याज्य ठरविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे व त्याच वैचारिक गुलामगिरीचा स्वीकार केल्यामुळे भारतीय राजकारणाच्या पटलावर राष्ट्रीयत्व ही एक पोकळीच राहिली.
पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व आधी वर्णन केलेल्या हिंदू धुरीणींनी जी राष्ट्रीयत्वाची जाण समाजात सातत्यपूर्ण पध्दतीने जागी केलेली होती, ती येथे फळाला आली. व राष्ट्र उदघोषणा करणारा पर्याय दिसताच तो स्वीकारण्यास समाजाकडून सुरवात झाली. आधीच्या लेखातील दोनही उदाहरणे ही जनसंघ म्हणून नव्हे तर माझा देश ही भावना तीव्र असलेल्या समाजाने उत्स्फूर्तपणे स्वीकारली होती.
हिंदू समाज पर्याय शोधत होता व आता त्या हिंदू समाजाला तो सापडला होता. सामान्य हिंदू समाज जनसंघामध्ये त्याचे अखंड भारताचे, स्वाभिमानी भारताचे, विश्वगुरू भारताचे स्वप्न पहात होता पण एवढा झटपट हा पक्ष कसा वाढू शकतो अशी शंका असणा-याना ही समाजाची आर्त भावना कधी समजलीच नाही.
तरी राजकारण म्हणून जोडतोड, अन्य विषय अस्तित्वात होते.फक्त राष्ट्रीयत्व एवढाच विषय राजकारणात नव्हता. अशातच भारतीय राजकारणात, समाज जीवनात लोकशाही संकटात टाकणारी १९७५ ची आणीबाणी आली व त्या विरोधात झालेला समाज विद्रोह याने जगाला वैचारिक दृष्ट्या समृध्द समाज म्हणजे काय असतो हे भारतीय समाजाने जगाला दाखवून दिले. भूक, अज्ञान, समाज दोष हे सर्व असुनही व्यक्तिस्वातंत्र्य ही भारताची सांस्कृतिक ओळख हे सर्व जगाला भारताने समजावून दिले.
आणीबाणी आणली गेली तरी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ समाज हा स्वातंत्र्य संकोच सहन करत नाही हे भारताने जगाला दाखवून दिले. व सनदशीर मार्गाने आणिबाणी दूर करून दाखविली.
पण हे थोडे वेगळे वावटळ पण महत्त्वाचे म्हणून आपण पाहिले पण समाजाचा सातत्याने जो राजकारणात राष्ट्रीयत्व शोधण्याचा व विकसित करण्याचा प्रयत्न चालू होता तो पुढील लेखांमध्ये पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (99/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment