छद्म धर्मनिरपेक्षता राजकीय शब्दावलीत नवीन हिरा
लेखांक ९९*
भारतीय राजकारणाच्या दृष्टीने यावेळी जगभर पसरलेला भारतीय हिंदू समाज, व त्यात संघ संस्काराचे बाळकडू प्यालेले स्वयंसेवक यांच्यामुळे जरा फरक पडू लागला होता. भारताने ताठ मानेने जगासमोर उभे असावे, आमचे तारणहार असावे, गरज असेल तर सेवा घ्यावी, असा भाव जगभर तयार होत होता.
भयचकित जगाला भारतीय संस्कृती, धर्म व स्वयंसिद्ध वैचारिक बांधणी खुणावू लागली होती.
अशातच भारतीय राजकारणाला राष्ट्र, धर्म, संस्कृती, व. विषयावर सुस्पष्ट भूमिका घेण्यास भाग पाडणारे रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाले व या विषयी सर्वात स्पष्ट भूमिका घेऊन संपूर्ण देशाला व राजकीय पक्षांना भूमिका घेण्यास भाग पाडण्याचे ऐतिहासिक काम लालकृष्ण अडवाणी यांनी केले. छद्म धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय राजकारणात परवलीचा शब्द बनला. बहुसंख्यांक समाज हा निवडणूक पटलावर वजीराच्या भूमिकेत आणून बसवला. कोणीही त्यापासून दूर राहू शकत नाही. अल्पसंख्याक गंड एका रथयात्रेने संशयाच्या भोवऱ्यात टाकला. भारतात धर्मातील राष्ट्रकारण हे उलगडले गेले.
लालकृष्ण आडवाणी यांनी भारतातील राजकीय परिभाषा बदलून टाकली. राष्ट्रीयत्वाची सांस्कृतिक संक्लपना या द्रष्ट्या राजनेत्याने सामान्य माणसाला माहिती करून दिली.
अन्य तपशील भरपूर आहेत पण तात्विक बैठक ही नेत्याकडे असेल तर सारा सारीपाट तोच मांडतो हे सिध्द झाले.
सर्व वैचारिक विरोधक भयग्रस्त झाले. सर्व रचलेले सिध्दांत मातीत मिसळले. स्वामी चिन्मयानंद, मा बाळासाहेब देवरस यांचे हिंदू हिताला मत याने सामाजिक हित झालेच पण एक कमकुवत खांब होता, राजकारण. तो ही स्थिरावला.
पुढील सर्व निवडणुका हिंदू अन्याय सहन करणार नाही व. बहुसंख्यांक लोकांची हुकूमशाही व. युक्तीवादांवर चालल्या.
राजकारणातून जात आपोआप दूर झाली व वैचारिक दृष्ट्या हिंदू असे काही नसते म्हणणा-यांना राजकीय चपराक मिळाली.
दृश्य परीणामांची चर्चा पुढील लेखांमधून.
सुनील देशपांडे
Article (100/n)
Comments
Post a Comment