राजकारणाचे हिंदूकरण
लेखांक ८८*
भारताची फाळणी १९४७ साली हिंदू मुस्लिम या आधारावर झाली. तरीही हिंदू म्हणून हिंदूना मान्यता नाही, फाळणी मागुनही मुस्लिम समाजावर संशय व्यक्त करण्यास परवानगी नाही, फक्त जातीचे अस्तित्व मात्र मान्य करा असा वैचारिक तिढा ह्या विचारवंत कंपू व सरकारने हिंदू समाजासमोर उभा केला.
पण हिंदू शब्द पुनरपि वैभवशाली बनवायचा हा वीडा घेतलेल्या हिंदू समाजाने योगी अरविंद, स्वामी विवेकानंद यांचे पाथेय व डॉ हेडगेवार यांनी निर्माण केलेली कार्यपद्धती याच्या आधारे आधी संघटन व नंतर दखलपात्र अस्तित्व दाखवून देण्यास सुरुवात केली.
पक्ष म्हणून नाही पण हिंदू म्हणून हिंदूंनी हिंदू हिताच्या प्रश्नांना भिडायला सुरवात केली . मिनाक्षीपुरम प्रकरण असो, अटलबिहारी वाजपेयी यांचे संसदेतील अधिकृत भाषण आता हिंदू मार खाणार नाहीत असो व शेवटी हिंदू जागरणाच्या अव्याहत प्रयत्नातील सर्वात महान प्रयत्न म्हणजे अयोध्या. हिंदू समाज हिंदू हितासाठी उभा राहिला.
एकात्म मानव वाद हा शुद्ध हिंदू जीवन विचार हा राजकीय पक्षाची भूमिका म्हणून पं. दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. व अयोध्या आंदोलनाने तो देशाच्या चिंतनात मध्यवर्ती आणला.
हिंदू शब्द, हिंदू संघटन विरोधी शक्तींनीच राजकारणाच्या मध्यवर्ती आणला, नाही त्यांना आणायला हिंदू समाजाने भाग पाडले. हिंदू हिताला मत हे या वायुमंडलातूनच जन्माला आले. व वैचारिक पराभवाच्या भयगंडातून राजकारणाचे भगवेकरण व. टीका या हिंदू विरोधी वैचारिक कंपूमधून सुरू झाली. हिंदुत्व राजकिय ऐरणीवर आले.
अयोध्या प्रश्नाने सर्व गृहितक मोडली व त्यामुळे दिशाहीन विचारवंत हिंदुत्वाच्या मागे लागले पण तोपर्यंत हिंदू समाजाचे काम झाले होते. राजकिय स्तरावर ५/१० टक्कात असणारी जात अता ८०% हिंदू समाजाची शक्ती बनली.
राजकिय व सामाजिक दोनही स्तरावर हे परीवर्तन घडले. रामाने हे परीवर्तन घडवले व एकात्म भारताचे दर्शन घडवले.
कसे? पाहू. पुढील लेखात
सुनील देशपांडे
Article (89/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment