अयोध्या आंदोलनाचे व्यापक परिणाम
लेखांक ८९*
हिंदू समाज दोषमुक्त करणे हे फक्त हिंदू समाजालाच स्वयंस्फूर्तीने शक्य आहे. व स्वाभिमानी संघटित हिंदू समाज ही त्याची पूर्व अट आहे हे हिंदू समाज धुरीणींचे आकलन योग्य आहे हे या अयोध्या आंदोलनाने सिध्द करून दाखविले.
जातींच्या रेषा पुसट तर भेदाच्या भिंती ढासळून दाखविल्या. अस्पृश्यता घरातून काही काळासाठी निलंबित करून दाखविली. जातीचीच ओळख असणाऱ्या समाजाला व्यापकतेचे भान आले. सर्वे हिन्दवा सहोदरा याची अनुभूती समाजाने स्वतः घेतली. रामासमवेत भिल्ल तसे यावेळी सर्व हिंदू, समाज म्हणून एक आला. मोठी रेषा मारण्याचा १०० वर्षांचा प्रयत्न यशस्वी झाला. हिंदू या मिठीत जाती व समाज दोष विरघळून गेले.
तेच राजकीय पटलावर घडले. २०१४ला हिंदू बाजूने विचार करण्याच्या राजकीय प्रक्रियेला पूर्ण वळसा मिळाला. ३७० कलम जाणे हा कळसाध्याय झाला. इतिहास सत्याचा शोध घेऊ लागला तर राष्ट्रीय विचाराची गुदमर संपली.
येशूची लेकरं जो लैंगिक विकृतीचा खेळ राजरोस खेळत होते, बाल शोषण करत होती, त्यांना हातकड्या दिसु लागल्या, मुल्ला मौलवींचा हलालाचा गोरज धंदा कायद्याच्या कचाट्यात आला, तर आंतरराष्ट्रीय NGO ना हिशोब ठेवणे भाग पडले. सेवेसाठीचे पैसे धर्मांतरासाठी वापरणा-या टोळ्या गजाआड, व दुकाने कुलपाआड गेली. समान नागरी कायदा शक्यतेच्या पटलावर आला.
हे दृश्य परीवर्तन या अयोध्या आंदोलनाने केले. म्हणून विस्ताराने पाहिले.
पण अजून दोन पैलुंचा विचार आवश्यक आहे तो पुढील लेखांमध्ये.
सुनील देशपांडे.
Article (90/n)
Comments
Post a Comment