मंडल आयोग व हिंदुत्व

लेखांक १०१*

हिंदू समाजाने १९८९ पासून राजकीय जागृकते बाबत अजिबात तडजोड न करता निर्भेळ यशासाठी प्रवास सतत चालू ठेवला. यामध्ये हिंदुत्वात अडथळे होऊ शकतील असे अनेक मुद्दे घुसविण्याचा प्रयत्न चालूच होता, पण हिंदुत्वाच्या व्यापक कक्षातच सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे हिंदू समाजाने निश्चित केले होते.

जाती आधारित राजकारण करणा-या पक्षांना हिंदुत्व अमान्य असे व यासाठी मंडल आयोग आणून हिंदूंनी पुन्हा जातीत अडकून विचार करावा हा मोठा प्रयत्न झाला. पण या आयोगाच्या निमित्ताने हिंदूत्व विरोधकांच्या अनेक गृहितकांना मूठ माती मिळाली.
बि.पी. मंडल, मंडल आयोगाचे प्रमुख. हिंदुंच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून आरक्षण भूमिका ठरवली. पण हिंदु जातीत विभागला न जाता हिंदुत्वात मिसळून गेला. राजकारण्यांसाठी करायला गेलो एक असे झाले.

मंडल आयोगामुळे हिंदू हा शब्द उच्च वर्णीय लोकांसाठी आहे, बाकीच्यांना धर्म नाही व. मानणा-यांना चपराक बसली होती. मंडल आयोगात येणा-या जातींना धर्म होता व तो हिंदू होता. त्यामुळे आरक्षण घेऊ पण आमचा धर्म आम्ही का सोडू. हा साधा प्रश्न उपस्थित केला गेला. जात ही धर्माविरुद्ध वापरण्याची तलवार आहे असे मानणा-यांचा संपूर्ण पराभव हिंदुत्वाने केला. व तीन टक्के म्हणजे हिंदू हा वैचारिक भाबडेपणा मोडून सर्वदूर भारत माता की जय म्हणणारा हा सर्व जातीतील हिंदू, ही दिसणारी, पण मुद्दामच डोळेझाक केलेली, ओळख पुन्हा स्वतः ला करून दिली.

असे अनेक वार करण्याचे प्रयत्न झाले,  पण असफल झाले. या सर्व राष्ट्र जागरणाच्या प्रयत्नातून२०१४ साल उजाडले. 

तत्पूर्वी भाजप सरकारे आली होती पण स्वबळावर नव्हती. त्यामुळे भाजपची विशेष वैशिष्ट्ये त्या सरकारांना नव्हती. म्हणून २०१४ ज्यात पूर्ण राष्ट्रीय विचाराचे सरकार आले ते वैशिष्ट्यपूर्ण ठरले.

त्याचे परिणाम पुढील लेखांमधून.

सुनील देशपांडे
Article (102/n)
Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन