देशाला स्वतः ची ओळख सरकारी स्तरावर


लेखांक १०५

भारतात वैचारिक भारतीय बनावटीचे सरकार आले व आगळ्या वेगळ्या वायुमंडलाचा देशाला परिचय होण्यास सुरुवात झाली.

त्यातील सर्वात सुखद सुरवात म्हणजे हा देश असंख्य नरवीरांच्या, समाजधुरीणींच्या प्रयत्नांमुळे स्वतंत्र झाला आहे हा साक्षात्कार होय. अन्यथा आमचा स्वातंत्र्य लढा गांधी नेहरू नावाने सुरू व त्याच दोन नावांनी समाप्त होत होता. लांबचे सोडा पण पटेल, बोस हे काॅंग्रेसी नेते सुध्दा वळचणीला पडले होते. त्यामुळे सावरकर व. नावे माफीवीर म्हणून हिणवण्यासाठी असावीत हे स्वाभाविक होते. सामाजिक क्षेत्रात स्वामी विवेकानंदांचे स्थान नव्हते तर योगी अरविंद व. या नावाचा विचारच सोडा.
अशा असंख्य अनामिक देशभक्त, संस्कृती संवर्धक महापुरूषांनी देश घडवला हे सरकारी स्तरावर स्विकारले गेले.

पण २०१४ पासून विचारवंतांना हवे ते नेते असे न रहाता, समाज प्रेम करतो अशा प्रत्येक नेत्याला त्याचा उचित सन्मान मिळू लागला.
सुभाषचंद्र बोस यांच्या फाईल्सना उजेडाचे दर्शन घडले तर लोहपुरुष सरदार पटेल यांचे भव्य स्मारक उभे राहिले.सावरकर हे नाव महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील तरूण उच्च रवात घेऊ लागले.

खरं तर समाजात हे चालूच होते. समाज श्रध्देने या महापुरुषांचे स्मरण करतच होता. पण त्याला सरकारी प्रतिसादाची साथ मिळाली. हे कोण? असा प्रश्न पद्मश्री पासून भारतरत्न पुरस्कारां पर्यंत पुरस्कार्थीं विषयी लोकांना पडू लागला. कारण काम करणा-यांच्या दारात पुरस्कार आले. नानाजी देशमुख भारतरत्न कारण ग्रामविकासाचा गोंडा प्रकल्प. हा प्रकल्प लोकांना माहिती होता पण कर्ता भारतरत्न जाहीर झाल्यावर लोकांना समजला.

हे परिवर्तन लोकांना सुखावू लागले. देशभक्ती हा अपमानित होण्याचा नाही सन्मानाने मिरवण्याचा विषय बनला.

असे मुलभूत परिवर्तन घडत होते. काही भाग पुढील लेखांमधून.

सुनील देशपांडे.
Article (106/n)
Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन