लोक सहभाग. बदलत्या राजकीय परिभाषेमुळे
लेखांक १०६
आपण पहात आहोत कि पूर्णपणे या मातीतून जन्मलेले तत्वज्ञान घेऊन आलेल्या राजकीय विचारांच्या सरकारमुळे प्रचंड वेगळेपणा सामान्य समाजाला व जगालाही पहायला मिळत होता. तसेच प्रथमच लोकसहभाग ही संकल्पना ही ख-या अर्थाने लोकांना पहायला व सहभागी होण्यासाठी संधी म्हणून मिळाली.
भारतातील स्वच्छता अभियान. यामध्ये आपणच आपल्या घरी संडास बांधावा ही योजना. लोकांचा सहभाग मागितला व तो सहभाग अपेक्षेपेक्षा अधिकच मिळाला. खेड्यापाड्यातून स्त्रीयांची लज्जास्पद अवस्था संपली. व सार्वजनिक व्यवस्थेमुळे येणारा बेजबाबदारपणा ही संपला.
असेच लोकसहभाग याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गॅस अनुदान सोडावे हे जनतेला केलेले आवाहन. लोकांनी अनुदान सोडले व त्या सोडलेल्या अनुदानातून समाजाच्या गरीबाला, वंचिताला शेगडी व गॅस मिळाला. असेच जग आश्चर्य चकित झाले ते जनधन बॅंक खाते या योजनेत कोट्यवधी गरीब सहभागी झाले. सर्व जनता सहभागी अशी एकात्मिक अर्थ व्यवस्था उभी राहिली. अर्थव्यवस्थेच्या गतीसाठी व वाढीसाठी सर्वसमावेशक अर्थव्यवस्था आवश्यक असते ती या लोकसहभागातून शक्य झाली. नोटाबंदीचे यश हे तर समाज सहभागाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरले.
वास्तविक हे आर्थिक उपक्रम आहेत पण राष्ट्रीय विचाराने जाण्याचा सर्वात मोठा प्रयत्न असतो, आम्ही जनता म्हणून, समाज म्हणून हे करू. व म्हणून हे समाज सहभागाचे उपक्रम यासाठी विशेष महत्त्वाचे ठरतात.
पूर्वी सुध्दा लोकांना कार्यक्रम असतं पण लोकसहभाग हे तत्व नसल्याने सरकार मला काय देतय एवढाच विचार लोकांचा असायचा, त्याऐवजी आम्ही मिळून सरकारी योजना निर्माण करू व चालवू हा भाव निर्माण झाला व कार्यक्रम यशस्वी व परीणाम कारक होऊ लागले.
पण public participation साठी समाज संघटनेचा सहभाग लागतो व तो मिळवण्यासाठी नेतृत्वात ते कौशल्य असावे लागते. तसेच त्यासाठी समाजावर विश्वास असावा लागतो. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचंड आहे.
संघ संस्कारामुळे सरकारातील अनेकांमध्ये सुध्दा हे कौशल्य होते व परीणाम स्वरूप एक प्रचंड सकारात्मक उर्जेचा स्फोट जनतेमध्ये निर्माण झाला. व हे खरे राष्ट्रीय भावनेचे प्रकटीकरण असते. समाज व देश यांचे माता पुत्रांचे नाते ही सांस्कृतिक प्रेरणा हे काम करते.
अशीच वैशिष्ट्ये पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे.
Article (107/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment