स्वयंसेवी संस्था व नवजागृत हिंदू समाज

लेखांक १०७*


सरकार बदल हा विषय बाजूला ठेवून वैचारिक दृष्ट्या वेगळे सरकार आले व समाजाच्या मानसिकतेशी मिळालेले ते सरकार असेल तर काय घडत हे या स्वातंत्र्योत्तर राजकीय भारतात नवीनच होते. म्हणून त्याचे विविध पैलू, भाग अभ्यासणे आवश्यक आहे. फारच प्रयत्नपूर्वक समाजाने स्वतः ते परीवर्तन घडवून आणलं होतं. व आता समाज त्याची सत्ताधारी म्हणून फळे चाखत आहेत. व विविध अपरिचित संकटांवर सरकारच्या मदतीने मातही करत आहे.


यातील राष्ट्राला आतून पोखरून टाकणा-या व बाहेरून जगात बदनाम करणा-या अशा एका संस्थाजीवनाचा मोठा सहभाग आहे. हा फार मोठा मायावी राक्षस भारताला अनेक वर्षे ग्रासत होता.


या संस्थांचे ओळखीचे नाव असते. NGO. अशासकीय संस्था. यांना समाजसेवी संस्था असेही म्हणतात. यांना सेवा संस्था म्हणत असले तरी प्रत्यक्षात खायचे अन दाखवायचे दात वेगळे असतात. यांना दुखितांचे दु:ख दूर करण्यात रस कमी व त्याचे भांडवल करून समाजवीण उद्धस्त करण्यात रस अधिक. अशा प्रकारे प्रयत्न करणे हे मुख्य काम असते.


सामान्य जनजीवन चालू असताना अचानक एखादी समस्या me too म्हणत येते, त्याचा फायदा संपेस्तवर, एखाद्या चर्चवर दगडफेक होते, तवर अचानक mob lynching होते. हे कमी म्हणून की काय  अचानक मंदीरातील महिला प्रवेश हा केरळमधील विषय राष्ट्रव्यापी बनतो. 


सामान्यपणे मुख्य प्रवाह बदनाम होईल, अगतिक होईल, लाचार होईल हा या संस्थांचा हेतू असतो व अशा संस्था व अशा संस्थांचे प्रमुख हे अचानक International spokesperson बनतात. 


या सेवाभावी संस्था गब्बर असतात, विकृत व्यवहार आरोप झालेले असतात, पण भारतासारख्या सुसंस्कृत व शालीन  व प्रचंड देशालाही हतबल करण्याची ताकद ठेवतात. यांचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे असतात .


यांच्या कार्यक्षेत्रात इतिहास, शिक्षण, कायदेशीर कारवाई व. अनेक विषय असतात व समाज सुधारक हा मुखवटा मिरवण्यासाठी असतो.


नवीन सरकार शुध्द मनाने काम करणारे आल्यावर सामान्य नागरिकांना या लबाडांची आवताण समजू लागली व त्या संस्थांना विरोध सुरू झाला. व मानवी हक्क नावाचं अजून एक विष यातून बाहेर पडू लागले.


पण जनता व सरकार सावरले. या संस्थांचा काळा चेहरा सामान्य जनता व सरकार समजू लागले व या संस्थांचे निर्विघ्नपणे चालू असलेले आर्थिक गोरज धंदे बाहेर येऊ लागले. वर्षानुवर्षे हिशोब नाहीत, परदेशातील प्रचंड पैसा सरकारला सांगायचा नाही हा खेळ बाहेर आला. हिशोब द्या नाहीतर, ही नवीन सरकारची भाषा कळायला वेळ गेला. पण सरकार ठाम राहिले.


आपली माध्यमे आपले संरक्षण कवच ही बिनदिक्कत चालू योजना बंद पडली. पैशाचे व प्रसिध्दीचे स्त्रोत आटू लागले, हिशोब देणं आवघड होऊ लागले, पोर विकणा-या संस्था उघड्या पडू लागल्या. पण लोकेच्छेचे सरकार व तत्व स्पष्ट असणारे सरकार, राष्ट्रवादी जनता यांनी आता आरपारची लढाई सुरू केली व या कॅंसर पासून होणारे देशाच नुकसान घटू लागले. सर्व जण हिशोबात आले.


ही फार मोठी लढाई, आंतरराष्ट्रीय पसरलेली लढाई, धीराने लढण्याची लढाई, लढणे सुरू झाले व जिंकण्याची स्थिती आली. 


असेच वेगळेपण पाहू या पुढील लेखांमध्ये.


सुनील देशपांडे
Article (108/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन