सीमा समस्या व ताठ मानेचा देश
लेखांक १०८
मूलभूत चिंतनात फरक असेल तर परीवर्तन हे किती व्यापक व सर्वव्यापी असते हे आपण पहात आहोत. व यातील सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय प्रश्नांवरील भूमिका व त्या व्यवहारात कशा प्रकारे आणल्या जातात.
फारच थोड्या देशांना ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात जसे भारत चीन संबंध. अनेक कंगोरे असणारे हे अतिशय नाजूक प्रकरण आहे.
चीनकडे जबरदस्त धक्का देण्याची क्षमता आहे. प्रचंड आर्थिक क्षमता आहे. हाताशी हुकूमशाही आहे. स्वभावतः कम्युनिझम अक्राळविक्राळ विस्तारवादी आहे व . अशा सर्व जमेच्या बाजू. व अजून एक महत्वाचे म्हणजे पंचमस्तंभी कारवाया करणारे भारतातील चीनचे मित्र कम्युनिस्ट.
गलव्हान व्हॅलीतील संघर्ष ही फक्त लढाई नव्हती तर वैचारिक राजकीय परिवर्तन झाल्यावर भारत कसा प्रतिसाद देणार आहे याचे उदाहरण आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रचंड मोठी समाईक सीमा दोघांची आहे. पण पुर्वीचे बोटचेपेपण २०१४ पासून घटू लागले आहे. मैत्री समानतेच्या निकषांवर होणार. व्यवहार चालू पण चीनी समुद्रात छोट्या देशांना संरक्षण देण्याची तयारी सुरू करणार. जागतिक महासत्तांसोबत चर्चा करताना १३० कोटी जनसंख्या ही संकट न वाटता शक्ती वाटू लागली. जगभरातील भारतीय युवा शक्ती ही ब्रेन ड्रेन न वाटता ब्रेन गेन वाटून त्याचा उपयोगही सुरू केला.
सर्व प्रकारच्या चढ उतारासह छोट्या छोट्या सीमा तंटासह, संघर्ष निर्णायक पातळीवर आला.
प्रत्यक्ष घुसखोरी झाली. संघर्ष झाला, जगातील १/३ लोकसंख्या युद्धजन्य परीस्थितीत सापडली. व फरक येथे दिसला. शांततेसाठी युद्ध नको, माघार हे सुत्र बदलले होते. रक्तपाताला घाबरून न्याय अन्यायात, अन्याय सहन करायचा नाही. महाभारतातील कृष्णाची गीता ही सिध्दांत भूमिका राहीली. व सत्त्याचा शोध लागला.
अन्यायाविरुद्ध संघर्ष हा कमी रक्तपात करतो व आत्मविश्वास जागा करतो.
गलवान व्हॅली संघर्षाने भारतीय जनतेला दोन्ही दिले. संघर्षाची मानसिकता व विजीगिषु वृत्ती.
असाच महत्वाचा पैलू पुढील लेखांमध्ये.
सुनील देशपांडे
Article (109/n)
Photo courtesy Google
Comments
Post a Comment